शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तिघा कर्मचाºयांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:18 IST

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना तिडके कॉलनीतील पवन प्रतीक पाटील (२५) याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) उघडकीस आली़ या प्रकरणातील गुन्हे शोध पथकातील नाजीर शेख, नितीन गायकवाड व वैभव परदेशी या तीन कर्मचाºयांची पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़

पंचवटी : आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तीन युवकांचा  आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना तिडके कॉलनीतील पवन प्रतीक पाटील (२५) याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची  घटना शनिवारी (दि़१६) उघडकीस आली़ या प्रकरणातील गुन्हे शोध पथकातील नाजीर शेख,  नितीन गायकवाड व वैभव परदेशी या तीन कर्मचाºयांची पोलीस आयुक्तांनी प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़  गुन्हे शोध पथकाचे पोलीस पाठलाग करीत असताना पवन पाटील, जितेंद्र रामकुमार शर्मा व सुनील साहेबराव जमदाडे हे तिघेही विहिरीत पडले़ यापैकी शर्मा व जमदाडे या दोघांना पोलिसांनी वाचविले़ मात्र घटनेस दोन दिवस उलटूनही बेपत्ता पवनचा पोलिसांनी शोध न घेतल्याने संशय निर्माण झाला होता़ तसेच पोलिसांच्या पाठलागामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता़ तसेच साडेतीन वाजेची घटना असताना पोलिसांनी अग्निशमन दलास उशिरा माहिती का दिली, पोलीस पाठलाग करीत होते तर हे ट्रक टर्मिनसजवळ असताना महामार्ग ओलांडून हे तिघे इकडे कसे पळाले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.देहविक्री व्यवसाय जोमातआडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास देहविक्री व्यवसाय जोमात सुरू असून, या व्यवसायास पोलिसांकडूनच खतपाणी घातले जात असल्याची चर्चा आहे़ तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या या युवकांची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलिसांना या देहविक्रय करणाºया महिलांनीच दिल्याची चर्चा होती. पोलीस आयुक्तांनी या घटनेची दखल घेतली असून, या तिघाही पोलीस कर्मचाºयांची प्राथमिक चौकशी सुरू केली असून दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे़