शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मिसर हत्त्या कटप्रकरण जेल प्रशासनाची चौकशी

By admin | Updated: June 28, 2015 01:42 IST

मिसर हत्त्या कटप्रकरण जेल प्रशासनाची चौकशी

  नाशिक : दहशतवादविरोधी पथकाचे सरकारी वकील अजय मिसर यांची हत्त्या करण्याचा कट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रचल्याचे पोलीस चौकशीत समोर आले असून, या प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी (दि़२७) पत्रकार परिषदेत सांगितले़याबरोबरच अ‍ॅड. मिसर यांची सुरक्षा वाढविण्यात आली असून, संबंधित आरोपीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केल्याचे शिंदे यांनी सांगितले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या ११२ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ शिंदे यांनी सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोट, दहशतवादविरोधी पथक, मोक्का न्यायालय तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्'ांच्या खटल्यांमध्ये अ‍ॅड़ मिसर हे सरकारची बाजू मांडतात़ नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात त्यांच्या हत्त्येचा कट रचला जात असल्याचे व त्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाइलची माहिती मुंबई मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे निनावी पत्राद्वारे पाठविण्यात आली होती़ यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया, अ‍ॅडीशन डीजी मीरा बोरवणकर, नाशिकचे पोलीस आयुक्त एस़ जगनाथन यांना चौकशीचे आदेश दिले होते़ या चौकशीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या मोक्का कैदी बराकमध्ये हा हत्त्येचा कट रचल्याचे व मोबाइलचा वापर केल्याचे समोर आले आहे़ मध्यवर्ती कारागृहात कट रचण्याचे षडयंत्र रचले जाणे ही गंभीर बाब असून, कारागृहात मोबाइल कसा पोहोचला, याबाबत जेल प्रशासनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़ तसेच मिसर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, गुन्'ाच्या सखोल तपासासाठी आरोपीचा ताबा मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले़