शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चिमुकल्यांनी घडविला कलागुणांचा आविष्का

By admin | Updated: June 8, 2014 00:18 IST

मालेगावला हिमांशू अहिरे प्रथम

 

नाशिक : लोकमत बालविकास मंचच्या वतीने सिन्नर, मालेगाव, येवला आणि सटाणा येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी प्रारंभी स्वर्गीय बाबूजी तथा जवाहरलालजी दर्डा व गणेश प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ या स्पर्धेतील यशस्वीताना गौरविण्यात आले. मालेगावला हिमांशू अहिरे प्रथमलोकमत बालविकास मंच व खाबिया इंडियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने कर्म. या. ना. जाधव विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे काढत स्पर्धेला प्रतिसाद दिला. यावेळी विविध विषयांची मांडणी करीत चित्र काढण्यास मग्न झालेल्या विद्यार्थ्यांचे चित्र पाहावयास मिळाले.प्रमुख अतिथी म्हणून राजस्थान इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक प्रेमसुख चोरडिया तसेच कर्मवीर या.ना. जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. बी. ताजणे उपस्थित होते व एलव्हीएच इंग्लिश मीडियम स्कूलचे कलाशिक्षक इफ्तेकार अहमद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना गटनिहाय बक्षिसे देण्यात आली.इयत्ता पहिली ते चौथी गटातील बक्षीसपात्र विजेते : प्रथम - हिमांशू रवींद्र आहिरे, द्वितीय- आर्या योगेश शेवाळे, तृतीय- शामली सोनवणे यांनी पटकावली. तसेच इयत्ता पाचवी ते आठवी गटातील बक्षीसपात्र विजेते : प्रथम - सलोनी रवींद्र आहिरे, द्वितीय- तन्वी महेश मोरे, तृतीय- विवेक पंडित पवार यांनी पटकावली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश खैरनार यांनी तर आभार वसीम शेख यांनी मानले.सिन्नरला दोन गटांत स्पर्धासिन्नर येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला. सिन्नरला लोकनेते वाजे विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. स्पर्धेत विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.स्पर्धेसाठी दोन गट पाडण्यात आले होते. छोट्या गटातून प्रथम - अपर्णा गुळे, द्वितीय-श्रावणी गुजराथी, तृतीय-प्राची चांडोले, उत्तेजनार्थ- अपूर्व बोराडे व निखिल थोरात. मोठ्या गटात प्रथम-श्रेयस बोराडे, द्वितीय- प्रतीक दोडके, तृतीय - तृप्ती बोराडे, उत्तेजनार्थ- मानसी गुजराथी, सार्थक कट्यारे आदि स्पर्धक विजेते म्हणून घोषित केले. परीक्षणाचे काम एस. जी. पब्लिक स्कूलचे जी. ओ. आढाव यांनी पाहिले. यशस्वीतेसाठी कृष्णा वावधाने, गणेश पगार यांनी परिश्रम घेतले. येवल्यात निसर्गचित्रावर भरयेवला येथील चित्रकला स्पर्धा जनता विद्यालयात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून कला,वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य, भाऊसाहेब गमे, मुक्तानंद विद्यालयाचे प्रा. अजय विभांडिक, बीएसएनएलचे चेतन बागुल, एन्झोकेम विद्यालयाचे महेश अहेर उपस्थित होते. परीक्षक म्हणून शिद्धोधन ससाणे, अजय पावटेकर यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी निसर्गचित्र, फुलदाणीसह विविध विषयांवर चित्रे काढली. स्पर्धेत पहिल्या गटात प्रथमेश चेतन बागुल, वैष्णवी सूर्यकांत जाधव, मृणाल संतोष कुमावत, सुमेध महेश अहेर, प्रतीक्षा निशिकांत भोरकडे यांना, तर दुसऱ्या गटात साकेत भाऊसाहेब गमे, अनुप्रिता रतन खैरनार, साक्षी सुराणे, आकांक्षा अहेर, श्रुतीस सुभाष बागडे यांना बक्षिसे मिळाली. आभार व सूत्रसंचालन येवला प्रतिनिधी संदीप पावणे यांनी मानले.(लोकमत ब्युरो)