शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिमित्रावर हल्ला; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:02 IST

इंदिरानगर : ‘आवास’ या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर बुधवारी (दि.६) पिकअप जीप घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देदोघा संशयितांना पोलिसांनी अटक

 

इंदिरानगर : ‘आवास’ या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर बुधवारी (दि.६) पिकअप जीप घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून इंदिरानगरमार्गे गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षत्रिय यांनी तत्काळ इंदिरानगर परिसरात धाव घेऊन संशयास्पद महिंद्र पिकअप जीप (एमएच १५, ईक्यू ६६२३) अडविली. यावेळी संशयित युनूस शहा व जुनेद सय्यद या दोघांसोबत क्षत्रिय यांचा वाद झाला. क्षत्रिय यांनी पोलिसांना माहिती देणार असल्याचे सांगितल्यानंतर दोघे संशयित जीपमध्ये बसले आणि त्यांच्यापैकी चालकाने जीपने क्षत्रिय यांना धडक दिली. या धडकेत क्षत्रिय हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी याप्रकरणी गांभीर्याने तपास करत गुरुवारी सकाळी गुन्ह्यात वापरलेल्या जीपसह दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, क्षत्रिय यांनी कुठल्याही प्रकारे इंदिरानगर पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष अथवा गुन्हे शाखेला अशा पद्धतीने अवैध गोमांस होत असल्याची पूर्वमाहिती दिली नव्हती, त्यामुळे पोलीस याबाबत अनभिज्ञ होते, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुठल्याही प्रकारे शहरात कोठेही काहीही अवैध व्यवसाय आढळून आल्यास संबंधितांनी त्याची माहिती अगोदर पोलिसांना कळवावी.