शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अनुवादातून संस्कृतीची ओळख

By admin | Updated: March 26, 2016 22:54 IST

श्रीपाल सबनीस : आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषिक संमेलनास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : माणसांना माणुसपण टिकवायचे असेल तर एका देशाची संस्कृती दुसऱ्या देशाशी जुळविण्यासाठी आदान-प्रदान केवळ भाषिक अनुवादातूनच करता येईल. भारत बहुभाषिक देश आहे. प्रत्येक राज्यातील संस्कृती, अस्मिता वेगवेगळी आहे. अनुवादातून त्या संस्कृतीची ओळख होऊ शकते, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.त्र्यंबकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषिक साहित्य ंसंमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी सबनीस म्हणाले केवळ अनुवादावरच न थांबता प्रत्यक्ष भाषेद्वारे व्यवहारातदेखील उपयोग झाला पाहिजे. आजच्या तरुण पिढीबद्दल बोलताना ते म्हणाले, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारी संस्कृती कुठे चालली आहे. आजचा तरुण पुरुषार्थ बलात्कारामध्ये खर्च करीत आहे. हा संस्कृतीचा विकास आहे की ऱ्हास आहे याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. जगात शांतता नांदली पाहिजे. अहिंसेच्या मुद्द्यावर भगवान बुद्धांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. अन्यथा हा संस्कृतीचा पराभव मानावा. भाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल तर अनुवादाचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रोहित वेमुला आत्महत्त्या प्रकरण, दक्षिण कोरीयाने तयार केलेल्या हायड्रोजन बॉम्बचे प्रकरण, महात्मा गांधींचा वारसा सांगणारे खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद गांधींचा दाखला, संस्कृतीबद्दल बोलताना संगीत क्षेत्राचाही ऊहापोह केला ते म्हणाले, संगीत-नृत्य ही संगीताची-कलेची संस्कृती जगभर सारखी असली तरी प्रकार वेगवेगळे असतात. पं. रविशंकर यांची सतार भारतातच वाजते, परदेशातदेखील त्यांची सतार तेच संगीत ऐकविणार, अमृता खानविलकर देशात नाचते, परदेशातही नाचते. संगीत-नृत्य आदिंची कला भाषिक-अनुवादानेच समजून घेता येते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागतगीताने करण्यात आला. परंपरेप्रमाणे सरस्वतीपूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य बापूसाहेब देसाई यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. यावेळी हिंदी, मराठी, बेंगाली, संस्कृत व इंग्लिश भाषेचे प्रतिनिधी म्हणून पाच विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषेतून संवाद साधला. या कार्यक्रमासाठी स्व. परिघादेवी दिनकरराव पानगव्हाणे व्यासपीठावर इंडो-जपान इंटरनॅशनल रिसर्च फाउण्डेशन, जपान-योकोहामो-शी-जपानच्या श्रीमती राजकुमारी गौतम, निदेशक आय.एम.सी. बँक नाशिकचे अशोक सोनवणे, लँबरसार्ट, फ्रान्सचे लुईस व्हास्ट प्रोन्ही, डॉ. विद्या चिटको, व्हर्जिनिया, अमेरिका आदि मान्यवरांसह प्राचार्य चंद्रशेखर पाटील, प्रा.डॉ. घन:श्याम वडोळे, प्रा. निखाडे, प्रा. शिरसाठ आदि उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य बापूराव देसाईलिखित विख्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रीय जननायक : अ‍ॅड. उज्ज्वल निकम’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. (वार्ताहर)