शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा प्रस्ताव सादर करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:06 IST

सद्यस्थितीत हरणबारीचे पाणी दहिकुटे धरणात सोडणे शक्य नाही. मात्र दहिकुटे धरणासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.

मालेगाव : सद्यस्थितीत हरणबारीचे पाणी दहिकुटे धरणात सोडणे शक्य नाही. मात्र दहिकुटे धरणासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिले.येथील अपर जिल्हाधिकाºयांच्या दालनात दहिकुटे गिरणा धरण संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची व पाटबंधारे, महसूल विभागाच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत प्रभारी अपर जिल्हाधिकारी मोरे बोलत होते. गुरुवारी दहिकुटे धरणावर संतप्त शेतकºयांनी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघर्ष समितीचे दीपक पठाडे यांनी हरणबारी धरणातून पिण्यासाठी पाण्याचे एक आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी केली होती. तसेच पूरपाणी सोडण्यास टाळाटाळ करणाºया पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर प्रभारी अपर जिल्हाधिकारी मोरे यांनी संबंधित अधिकाºयांची लेखी रितसर तक्रार करा, तहसीलदारांना चौकशीचे आदेश देतो, असे सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.बी. रौंदळ यांनी हरणबारी प्रकल्प अहवालानुसार हरणबारी धरण लाभक्षेत्रातील गावांना पाणी गेल्यानंतर उरपूर पाणी दहिकुटे धरणात सोडण्याची तरतूद आहे. पाण्याचे आरक्षण नसल्यामुळे सद्यस्थितीत पाणी सोडता येणार नाही, असे सांगितले. तसेच मोरे यांनी १५ आॅक्टोबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात होणाºया पाणी आरक्षण बैठकीत दहिकुटे धरणाच्या पाणी आरक्षणाबाबत चर्चा करण्यात येईल. नंतरच पाणी सोडण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो.