शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकासह एकाची चौकशी

By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST

वाघ खून प्रकरण : परदेशी गँगला मदत, सहभाग निश्चितीनंतर गुन्हे दाखल

नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील वाघ खून प्रकरणानंतर मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या पंचवटीतील परदेशी गँगला मदत केल्याच्या संशयावरून महापालिका नगरसेवक पवन पवार व रिपाइंचा शहराध्यक्ष अर्जुन पगारे या दोघांचीही सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी शनिवारी (दि़२३) सुमारे पाच तास चौकशी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़ गुन्हेगारांना पाठबळ तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून, त्याअंतर्गत ही चौकशी करण्यात आली़ दरम्यान, चौकशीत सहभाग आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे़ पंचवटीतील सराईत गुन्हेगार टोळी परदेशी गँगने २७ मे रोजी हनुमानवाडी कॉर्नरवर सुनील वाघ या तरुणाचा खून केला होता़ या प्रकरणानंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार कुंदन सुरेश परदेशी (२४, दळवी चाळ, खंडेराव मंदिराजवळ, हनुमानवाडी), अक्षय कैलास इंगळे (२१, शिवशक्ती अपार्टमेंटशेजारी हनुमानवाडी), अजय जेठा बोरीसा (२५, फ्लॅट नंबर ६, चैतन्य हौसिंग सोसायटी, रामवाडी), करण रवींद्र परदेशी (२०, दळवी चाळ खंडेराव मंदिराजवळ, हनुमानवाडी),मयूर शिवराम कानडे (२३, फ्लॅट नंबर १, शारदा सरस्वती सोसायटी, मेहेरधाम), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (२३, फ्लॅट नंबर २४ बी, दिव्यदर्शन सोसायटी, विसेमळा, कॉलेजरोड), मयूर गोपाल भावसार (१९, सिद्धकला रो-हाऊस यशोदानगर मेहेरधाम), आकाश विलास जाधव (१९, मखमलाबाद नाका) यांच्यावर मोक्कान्वये कारवाई केली़मोक्कातील या संशयितांना पोलिसांनी १६ जुलै रोजी न्यायालयात हजर करून त्यांना पाठबळ तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती़ त्यानुसार न्यायालयाने या आठ संशयितांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ या कालावधीत पोलिसांनी परदेशी गँगला मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांची माहिती जमा केली असून त्यानुसार सर्वांची गुप्त चौकशी सुरू आहे़ या चौकशीनुसार सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी महापालिका नगरसेवक पवन पवार, तसेच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चा शहराध्यक्ष अर्जुन पगारे याची सुमारे पाच तास चौकशी केली़ मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या परदेशी गँगचे शहरातील मोठ्या राजकीय व्यक्तींसोबत संबंध असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले असून, या सर्वांचीच चौकशी केली जाणार आहे़ नगरसेवक पवार व पगारेच्या चौकशीमुळे शहरातील अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे़ तसेच या दोघांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे़ पोलिसांच्या या चौकशीमुळे राजकीय नेत्यांचे बुरखे फाडले जाणार असून, त्यांचे कृत्य जनतेसमोर येणार आहे. दरम्यान, गुन्हेगारांशी संबंध असल्याचे चौकशीअंत स्पष्ट झाल्यास अशांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)