शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षी इंटरनेटबंदी; यंदा शुभेच्छांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:16 IST

११ आॅक्टोबर २०१६. विजयादशमीचा सण शहरात साजरा झाला होता तो तणावाच्या स्थितीत. तळेगाव अंजनेरी येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे विजयादशमीला व्हॉट््स अ‍ॅपवरून संदेशाची देवाणघेवाण होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र, आदल्या दिवसापासूनच विजयादशमीनिमित्त शुभेच्छा संदेशांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि व्हॉट््स अ‍ॅपवरच प्रतीकात्मक स्वरूपात सोने लुटण्याचा आनंद व्यक्त केला गेला.

नाशिक : ११ आॅक्टोबर २०१६. विजयादशमीचा सण शहरात साजरा झाला होता तो तणावाच्या स्थितीत. तळेगाव अंजनेरी येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे विजयादशमीला व्हॉट््स अ‍ॅपवरून संदेशाची देवाणघेवाण होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र, आदल्या दिवसापासूनच विजयादशमीनिमित्त शुभेच्छा संदेशांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि व्हॉट््स अ‍ॅपवरच प्रतीकात्मक स्वरूपात सोने लुटण्याचा आनंद व्यक्त केला गेला.मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावरील लांबपल्ल्याच्या बसेस, खासगी वाहने तसेच सरकारी वाहनांचीही तोडफोड केली होती़ या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते़ विजयादशमीच्या दिवशीही शहर व परिसरात तणावपूर्ण स्थिती होती. त्यामुळे विजयादशमीवर तणावाचे सावट होते. या तणावाखालीच नाशिककरांनी विजयादशमीचा सण साजरा केला होता. त्यावेळी शहरात पसरणाºया अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी मोबाइल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरून विजयादशमीच्या शुभेच्छा नेटिझन्सला देता आल्या नव्हत्या. विजयादशमीच्या दिवशी इंटरनेट बंद राहिल्याने नागरिकांनी शुभेच्छांचे लघुसंदेश पाठविणे पसंत केले होते. जवळपास सर्वच नेटवर्क सेवा पुरविणाºया कंपन्यांनी दसºयानिमित्त लघुसंदेशाचादेखील पूर्ण चार्ज आकारला होता. तणावाची स्थिती पाहून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त असूनही त्यावेळी मुंबई महामार्गावर किरकोळ तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. वर्षभरापूर्वी तणावात विजयादशमी साजरा करणाºया नाशिककरांनी यंदाचा दसरा उत्साहात साजरा केला. व्हॉट््स अ‍ॅपवरून शुभेच्छा संदेश अक्षरश: ओसंडून वाहत होते.राम, रावण आणि उपहासात्मक संदेशविजयादशमीनिमित्त व्हॉट््स अ‍ॅपवर शुभेच्छा संदेशांचा पाऊस पडला शिवाय, राम आणि रावण यांच्या अंगभूत गुणांवरही प्रकाश टाकत सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला. दसºयानिमित्त महागाई, इंधनदरवाढीवर टिपणी करत सरकारवर तोंडसुख घेणाºया संदेशांनीही गर्दी केली होती. काही उपहासात्मक संदेश रंजन करणारे ठरले.