शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आरोग्य विद्यापीठातर्फे आंतरराष्टÑीय शैक्षणिक केंद्र : डॉ. दिलीप म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:03 IST

नाशिक : विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन अशा संधी उपलब्ध होण्यासाठी २० देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्दे‘लोकमत’शी साधला संवाद विद्यापीठाचा वर्धापन दिन

नाशिक : विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन अशा संधी उपलब्ध होण्यासाठी २० देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता योग शिक्षणाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारच्या आयुष विभागासोबत करार करून आरोग्य विज्ञानातील सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, योगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू म्हैसेकर म्हणाले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरू होऊन राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या १०० जागा वाढल्याचेही त्यांनी सांगितले.जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याच्या अनुषंगाने परीक्षाविषयक कामकाजात आॅनलाइन प्रणालीचा अंतर्भाव करून प्रात्यक्षिक परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आॅनलाइन पद्धतीने विद्यापीठास पाठविण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ई-पेमेंट गेटवे’ ही आॅनलाइन शुल्क अदा करण्यासाठी आवश्यक प्रणाली तयार केली असून विद्यापीठाच्या वर्धापन दिनापासून या सुविधेचा लाभ सर्व संबंधितांना घेता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.पीएचडीसाठी आॅनस्क्रीन मूल्यांकनविद्यापीठांतर्गत पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व त्यांचे मूल्यांकनदेखील आॅनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे, असेही ते म्हणाले.रुग्ण-डॉक्टर संवादहल्ली रुग्णालये व डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्ण-डॉक्टर यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, गैरसमजाचे प्रसंग टाळण्यासाठी संवाद कौशल्य या विषयाचा वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.संशोधन नियतकालिक लवकरचविद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील संशोधकांना आपले संशोधन साहित्य प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाचे पहिले संशोधन नियतकालिक एमयूएचएस हेल्थ सायन्स रिव्ह्यू लवकरच प्रकाशित होत आहे. त्याबाबतची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचेही डॉ. म्हैसेकर यानी सांगितले.