सातपूर : सातपूर आणि सिडको परिसरातील विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून पोलिसांनी ‘खात्याची भूमिका आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य’ याविषयी चर्चा केली. सातपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविला. यावेळी पोलिसांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. सातपूर आणि सिडको परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक सातपूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. महाविद्यालयात विविध डे साजरे करताना सावधानता बाळगावी, गुन्हेगारी वाढणार नाही याची काळजी घ्यावी. रॅगिंगबाबत त्वरित पोलिसांना खबर द्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. यापुढे महाविद्यालयातच बैठक घेऊन विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे, पोलीस उपनिरीक्षक माधवी वाघ यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर)सातपूर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करताना सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे.
पोलिसांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
By admin | Updated: October 14, 2015 22:34 IST