शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद

By admin | Updated: March 15, 2015 01:02 IST

शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद

नाशिक : विद्यार्थ्यांनी स्पर्धा ही स्वत:शीच करावी, कारण यशाचा मार्ग हा आपल्यालाच शोधावा लागतो, असे प्रतिपादन आरएएससीआय, एनएसडीसी, सीओओचे जेम्स रॅफेल यांनी केले़ मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर अ‍ॅड़ बाबूराव गणपत ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय व आयआरएल एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एम्प्लॉइबिलीटी स्कील व इम्पॉयमेंट कॉनक्लेव्ह २०१५च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ रॅफेल पुढे म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट जगत यांच्यात सुसंवाद घडावा तसेच विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी हे कार्यक्रम आवश्यक आहेत़ शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले़ रॅफेल यांनी विद्यार्थ्यांना ‘हुनर है तो कदम है’ हा यशाचा नवीन मंत्रही दिला़ यानंतर झालेल्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी माणसातील अंतरगुण वाढविणे, महिलांची प्रगती, ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य व इच्छाशक्ती, स्वत:तील उणिवा व गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले़या कार्यक्रमासाठी आयआरएलचे दिग्विजय खरोटे यांचे विशेष सहकार्य लाभले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी हिमांशु पंजाबी याने केले़ मान्यवरांचे आभार सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक मुकुंद चौगुले यांनी मानले़, तर कार्यक्रमाची सांगता एनएसडीसी प्रमाणपत्र वितरणाने झाली़ यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डीटीईचे सहसंचालक डॉ़ नंदनवार, एचएएलच्या एचआर विभागाचे महाव्यवस्थापक हाफिज, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे एचआर प्रमुख मेवाडा, एनजीओ प्रतिनिधी सलील पुलेकर, मराठवाडा शिक्षण मंडळाचे संचालक विश्वास पाटील, मेटच्या संचालिका शेफाली भुजबळ, आयआरएलचे उज्ज्वल शंकर यांच्यासह शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)