शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:17 IST

निफाड तालुक्यात उन्हाचा चटका बसू लागला असून, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरिक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवीत आहेत.

देवगाव : निफाड तालुक्यात उन्हाचा चटका बसू लागला असून, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरिक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवीत आहेत. काही दिवसांपासून तालुक्यातील तपमानात कमालीची वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन पडते. कडक उन्हामुळे लोक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर येणे टाळतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची सुरुवातच तीव्र झाल्यामुळे शाळेतून परतणारे विद्यार्थी, वृद्ध महिला व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे.  घरोघरी दुपारी आणि रात्रीही पंखे व कूलर सुरू असतात. उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांचा कूलर खरेदीकडे कल वाढला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या डेझर्ट कूलरसह नामांकित ब्रॅँडेड कूलरही बाजारात दाखल झाले आहेत. प्रवाशांकडून बाटलीबंद थंड पाण्याची मागणी वाढली असून, आइस्क्रीम, कुल्फी व शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सरबत, लस्सी, ताक, उसाचा रस आदींना मागणी वाढली आहे. शरीरात गारवा निर्माण करणारे कलिंगड, काकडीसह एसी, कूलर, गॉगल, स्कार्फ खरेदीस नागरिक पसंती देत आहेत. तहान शमवण्यासाठी माठातील थंडगार पाणी पिणे बहुतेकांना आवडते.  त्यामुळे उन्हाळ्यात फ्रीज असूनही माठ विकत घेणारे अनेक जण आहेत.डावा कॅनॉलमध्ये पोहणायांची गर्दीदुपारच्या वेळेत झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी शेतकरी सकाळी लवकर कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारी कॅनॉल, नदीवर, बंधाºयावर पोहायला जाणाºया मुलांची संख्या वाढली आहे. एकीकडे ऊन, तर दुसरीकडे अधूनमधून विजेचे झटके यामुळे नागरिकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. त्याचबरोबर पशुधनाचेही पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत. एप्रिल महिन्यात तपमान वाढले असून, मे महिन्यात काय अवस्था होईल याची चिंता नागरिकांना पडल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान