शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शिरसमणीत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:01 IST

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.

ठळक मुद्देकळवण : नियोजनाचा अभाव, लाखो रुपये खर्च करूनही योजना असफल

कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्रहण लागत गेल्याने गावाला पाणीटंचाई पाचवीला पूजली आहे.शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्याचे पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरून घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्रम पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले. गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली; मात्र ती अपयशी ठरली. गावात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे, त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते. त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितले.पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रुपये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले; मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतीच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते, वैशाली शिरसाठ, जिजाबाई पाटोळे, मंगलाबाई पाटोळे, सोनाली मोहिते, सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे . जीव धोक्यात घालून मिळते हंडाभर पाणीगेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून धावणाºया एका वाहनाने पाणी घेऊन जाणाºया आदिवासी महिलेला व मुलाला धडक मारल्याने दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसमणी हे ओतूर खोºयातील महत्त्वपूर्ण गाव आहे. ओतूर धरणाच्या गळतीचा प्रश्न कायमचा सुटल्यास शिरसमणी गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. धरणात पाणी असल्यास या परिसरात मुबलक पाणी असते; मात्र गळतीतून जानेवारी अखेर सर्व पाणी वाहून गेल्यावर या भागातील नरूळ, मेहदर, ओतूर, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, जिरवाडे, कळवण खुर्द आदी गावांना पाच महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सुनील वाघ यांचीदि. २४ मार्चपासून विहीर अधिग्रहित केली आहे. त्या विहिरीवरून शिरसमणी गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित बैठक किंवा कामकाजानिमित्ताने जावे लागते, त्यामुळे त्या दिवशीग्रामपंचायतीमध्ये जात नाही. अन्य दिवशी मी नियमित शिरसमणी ग्रामपंचायत कार्यालयात जाते.- ए. पी. गोराणेग्रामसेविका, शिरसमणीपाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. ग्रामपंचायतीने लाखो रु पये खर्च करून नवीन विहीर खोदली आहे; परंतु पाणी लागले नाही. ग्रामसेवक आठवड्यातून एखाद्याच दिवशी चमकत असल्याने उडवाउडवीची उत्तरे देतात. याबाबत तक्र ार कोणाकडे करायची ? हा मोठा प्रश्न आहे.- नामदेव शिरसाठ,शिरसमणी