शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांचे पितृपक्षात बौद्धिकभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:14 IST

पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करणारा पंधरवडा. श्राद्धविधीच्या माध्यमातून पितरांचा आत्मा तृप्त करण्याचा हा पंधरवडा. प्रामुख्याने, पितृपक्षात कोणतेही शुभकाम केले जात नाही. त्यामुळे या पंधरवड्यात मंदीचे वातावरण असते. कामकाजालाही फारसा वाव नसतो. म्हणूनच की काय, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने नेमकी हीच संधी साधत पितृपंधरवड्यात आपल्या ६६ नगरसेवकांसाठी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या कार्यशाळेत मान्यवर तज्ज्ञांकडून नगरसेवकांना महापालिका कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत.

नाशिक : पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करणारा पंधरवडा. श्राद्धविधीच्या माध्यमातून पितरांचा आत्मा तृप्त करण्याचा हा पंधरवडा. प्रामुख्याने, पितृपक्षात कोणतेही शुभकाम केले जात नाही. त्यामुळे या पंधरवड्यात मंदीचे वातावरण असते. कामकाजालाही फारसा वाव नसतो. म्हणूनच की काय, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने नेमकी हीच संधी साधत पितृपंधरवड्यात आपल्या ६६ नगरसेवकांसाठी मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तीन दिवसीय कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या कार्यशाळेत मान्यवर तज्ज्ञांकडून नगरसेवकांना महापालिका कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत.राज्यातील महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच भाजपा अनेक ठिकाणी सत्तेवर आली आहे. त्यात, बव्हंशी नवीन चेहरे आहेत. त्यामुळे प्रदेश भाजपाकडून नगरसेवकांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये महापालिकानिहाय अभ्यासवर्गांचे आयोजन केले जात आहे. या कार्यशाळेसाठी अद्याप नाशिकचा क्रमांक लागलेला नव्हता. मात्र, आता पितृपक्षातील मंदीच्या काळात भाजपाने आपल्या ६६ नगरसेवकांसाठी तीन दिवशीय कार्यशाळा भरविण्याचे नियोजन केले असून, त्याची तयारी सुरू असल्याची माहिती शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाने स्पष्ट बहुमत संपादन करत एकहाती सत्ता काबीज केली आहे. त्यात, मोजकेच नगरसेवक अनुभवी असून, बव्हंशी नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेची पायरी चढले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील भाजपाचा कारभार पाहता, महासभांमध्ये भाजपाचे सदस्य फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत याउलट विरोधकांनी महासभा गाजवत भाजपाला आव्हान दिलेले आहे. त्यासाठीच महापालिकेचे कामकाज कसे पाहावे, महासभांमध्ये कोणते प्रश्न मांडावेत, यापासून ते व्यक्तिमत्व विकासापर्यंतचे धडे या कार्यशाळेत दिले जाणार आहेत.