शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांनाही आता विमा संरक्षण

By admin | Updated: July 3, 2014 00:22 IST

झोपडपट्टीवासीयांनाही आता विमा संरक्षण

 

नाशिक : इंदूरच्या धर्तीवर करदात्या नागरिकांसाठी राबविण्यात येणारी अपघाती विमा योजना महापालिकेने आता झोपडपट्टीवासीयांनाही लागू केली आहे. त्यामुळे घरपट्टी किंवा स्लम चार्जेस नियमितपणे भरणाऱ्या ४८ हजार झोपडपट्टी रहिवाशांना पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.दहा वर्षांपूर्वी महापालिकेने करदात्या नागरिकांसाठी अपघाती विमा योजना सुरू केली. नियमितपणे मिळकत कर भरणाऱ्या करदात्याच्या चौकोनी कुटुंबासाठी ही योजना आहे. या योजनेत महापालिका ही संबंधित विमा कंपनीला करदात्यांच्या प्रीमियमची रक्कम भरते आणि त्या बदल्यात अपघाती घटना घडल्यास विम्याचे संरक्षण असलेल्या व्यक्तीला किंवा तिच्या वारसांना पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. अपघातात जायबंदी झाल्यास सुमारे पंचवीस हजार तर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. या योजनेत सर्पदंश झाला तरी आर्थिक मदत दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना राबविली जात असताना त्यात झोपडपट्टीवासीयांचा मात्र समावेश नव्हता. परंतु महापालिकेने आता योजना विस्तारली असून, झोपडपट्टीवासीयांनाही संरक्षण दिले जाणार आहे. ३१ मार्च अखेरीस ज्या अधिकृत झोपडपट्टीवासीयांनी घरपट्टी कर किंवा स्लम चार्जचा भरणा केला आहे आणि थकबाकी शून्य आहे, अशा मिळकतधारकांनाच योजनेत विमा संरक्षण मिळेल. ३० मे २०१४ पासून २९ मे २०१५ पर्यंत युनायटेड इंडिया इन्शुरन्समार्फत हा विमा उतरविण्यात आला आहे. अपघातग्रस्तांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अपघाताची घटना घडल्यास एक महिन्याच्या आता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नाशिक शाखा किंवा पालिकेच्या मूल्यनिर्धारण व कर संकलन, राजीव गांधी भवन येथे संपर्क साधण्याचे आवाहन विविध कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)