शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

सोसायटी संचालक, ग्रामपंचाय सदस्यांना विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST

बाजार समितीची सभा उपसभापती प्रभाकर मुळाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.७) घेण्यात आली. त्यात बाजार सिमतीतील आडते व व्यापारी यांच्याकडे ...

बाजार समितीची सभा उपसभापती प्रभाकर मुळाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.७) घेण्यात आली. त्यात बाजार सिमतीतील आडते व व्यापारी यांच्याकडे वसुलपात्र असलेली मार्केट फी दरमहिन्याच्या ७ तारखेपावेतो वसुल करण्यावर चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या नाशिक, त्र्यंबक, पेठ या तीन तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या सुमारे ३,१०० सभासदांना पाच लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमा कवचामुळे संबंधित सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रूपये, अपंगत्व आल्यास अडीच लाख रूपये व अपघात उपचारासाठी एक लाख रूपये मदत मिळणार आहे. या सभेस संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठूळे, भाऊसाहेब खांडबहाले, शाम गावीत, व्यापारी संदीप पाटील, हमाल व्यापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, विमल जुंद्रे, सचिव अरूण काळे, अरविंद जैन, निकाळे, घोलप आदी उपस्थित होते.

चौकट===

यांना मिळणार मदत

अंगावर झाड पडणे, विहीरीत पडून मृत्यू, तलावात पडून मृत्यू, शेतात काम करतांना सर्पदंश मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, दुचाकी व चारचाकी वाहन अपघातात मृत्यू झाल्यास विमाकवच असलेल्या व्यक्तीच्या वारसास पाच लाख रूपये मिळू शकतील

चौकट===

बाजार समितीच्या संचालकांनी केलेल्या गुजरात दौऱ्यात राजकोट येथील गोंदल बाजार समितीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच सभासदांचा विमा काढल्याचे सांगितले. त्याच धर्तीवर नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील विमा कवच देण्याचा विचार आहे.

- देवीदास पिंगळे, सभापती