सध्या संपूर्ण जगात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचूर उपबाजार आवारांवर तसेच तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रांवर कामकाज करणारे कायमस्वरूपी व रोजंदारीवरील सेवक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कोविड-१९ व इतर सर्व प्रकारच्या आजारांच्या उपचारांसाठी कोणतीही आर्थिक व्यवस्था नाही. त्यांना उपचारासाठी पैशांची निकड भासू नये, ही बाब विचारात घेऊन बाजार समितीमार्फत सर्व कायमस्वरूपी व रोजंदारीवर असलेल्या १४१ कर्मचाऱ्यांचा आरोग्यविमा काढण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या कायमस्वरूपी सेवकांना पाच लाख रुपयांपर्यंत व रोजंदारीवरील सेवकांना तीन लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळणार आहे. सदरची विमा पॉलिसी ही कॅशलेस असून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामांकित रुग्णालयात सदर विमा पॉलिसीद्वारे सेवकांना उपचार घेता येणार आहे.
लासलगाव बाजार समितीच्या सेवकांना विम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST