शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेटेंच्या अपात्रतेने प्रगतीला अपशकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:29 IST

मराठा विद्या प्रसारक संस्थेची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, सत्ताधारी प्रगती पॅनलचे जाहीर केलेले उमेदवार श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने प्रगती पॅनल बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, सत्ताधारी प्रगती पॅनलचे जाहीर केलेले उमेदवार श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने प्रगती पॅनल बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे. दरम्यान, श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करणाºया शिवसेनेच्या सुरेश डोखळेंना या कामगिरीमुळे विरोधी समाज विकास पॅनलची उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्थात, सुरेश डोखळे हेच आमच्या पॅनलचे उमेदवार याआधी निश्चित होते, असा दावा समाज विकास पॅनलचे नेते विद्यमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला आहे. समाज विकास पॅनलचा तालुका मेळावा सोमवारी (दि.३१) कोठुरे (निफाड) येथे झाला. या मेळाव्यात राजेंद्र मोगल, देवराम मोगल, जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांच्यासह तालुक्यातील काही आजी-माजी नेत्यांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली.दरम्यान, अध्यक्ष पदासाठी समाज विकास पॅनलकडून माजी खासदार प्रताप सोनवणे, दिलीपराव मोरे यांच्यासह दोन-तीन नावे चर्चेत असताना सत्ताधारी गटाकडून प्रताप सोनवणे यांंच्या विरोधात अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्यास फारशी कोणी उत्सुकता दाखविली नसल्याची चर्चा आहे. याउलट यावर्षी सत्ताधारी गटात सामील झालेल्या माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते यांनी अध्यक्ष पदाऐवजी सभापती पदासाठी पसंती दर्शविल्याने समाज विकास पॅनलने विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे यांना माणिकराव बोरस्ते यांच्या समोर उमेदवारीसाठी उभे करण्याची तयारी समाजविकास पॅनलने केल्याची चर्चा आहे.बागलाण-निफाड चर्चेतसर्वाधिक मतदार असलेल्या निफाड तालुक्यासह बागलाण व नाशिक तालुक्यात असलेली सर्वाधिक मतदार संख्या गृहीत धरून दोन्ही पॅनलकडून या दोन्ही तालुक्यांतच पाचही पदाधिकारी पदाची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. तसे झाले तर निफाड व बागलाण तालुक्याची भूमिका यंदाच्या निवडणुकीसाठी निर्णायक राहील. दोन्ही पॅनलने निफाड, बागलाण व नाशिक तालुक्यांवरच लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक शहरात बहुतांश ग्रामीण भागातील नेतेमंडळी व मतदार राहत असल्याने नाशिक शहरही चर्चेत आहे.माजी बाद, आजी आबादराष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा अर्ज बाद झाला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शेटे हे सत्ताधारी, तर पगार हे विरोधी पॅनलचे पदाधिकारी आहेत.