शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

व्यापाऱ्यांना सूचना : व्यापाºयांकडील प्लॅस्टिक साठा जमा करण्याचे आदेश सात ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:26 IST

नाशिक : महापालिका हद्दीत गेल्या २३ मार्चपासून प्लॅस्टिकच्या वापरावर संपूर्णत: बंदी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विक्रेते, व्यापारी आणि वितरकांना संबंधित वस्तूंचा वापर करण्यास मनाई केली.

ठळक मुद्देकेंद्रांवर प्लॅस्टिक साहित्य जमा करण्याचे व्यापाºयांना कळविले प्लॅस्टिक वेस्टन यांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे

नाशिक : महापालिका हद्दीत गेल्या २३ मार्चपासून प्लॅस्टिकच्या वापरावर संपूर्णत: बंदी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विक्रेते, व्यापारी आणि वितरकांना संबंधित वस्तूंचा वापर करण्यास मनाई केली असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाईदेखील सुरू केली आहे. मात्र विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वस्तूंचा साठा असल्यामुळे आणि पालिका तपासणी करीत असल्याने व्यापाºयांना दंड भरावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून पालिकेने आता शहरात सात ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे उघडली असून, या केंद्रांवर प्लॅस्टिक साहित्य जमा करण्याचे व्यापाºयांना कळविले आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. महाराष्टÑ विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यानुसार अशा वस्तू वापरण्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिका हद्दीतील सर्व उत्पादक, विक्रेते, व्यापारी, वितरक यांनी प्लॅस्टिक पिशव्या, डिस्पोजल पॅकेंजिंग, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्ज, प्लॅस्टिक वेस्टन यांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºयांना प्रथम गुन्ह्याच्या वेळी ५ हजार रुपये दंड, दुसºयांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड तर तिसºयांचा अशाच प्रकारचा गुन्हा घडल्यास संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे प्रयोजन या कायद्यात आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात या बंदीची मोठी धास्ती आहे. विशेष म्हणजे बंदी लागू होण्यापूर्वीच व्यापारी, दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवला होता. तसेच काही व्यापारी तर फक्त फ्लॅस्टिक आणि डिस्पोजल भांड्याचाच व्यापार करीत असल्याने त्यांच्याकडे मोठा साठा आहे. मनपाच्या तपासणी मोहिमेत अनेक व्यापाºयांना यामुळे हजारो रुपयांचा दंड भरावा लागला आहे. अशा वस्तू फेकूनही देता येत नसल्यामुळे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी व्यापाºयांची परिस्थिती झाली होती. यासंदर्भात व्यापाºयांनी महापालिकेकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. या वस्तू संकलित करण्याची उपाययोजना करण्याची मागणी व्यापाºयांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने नाशिक पूर्वमध्ये द्वारका गुदाम, नाशिक पश्चिममध्ये कल्पनानगर, हजेरी शेड, कॉलेजरोड, सातपूर विभागात सातपूर क्लब हाऊस, जिमखाना, सिडकोत विभागीय कार्यालय, नाशिकरोडला विभागीय कार्यालय, पंचवटीसाठी पंचवटी विभागीय कार्यालय तसेच खतप्रकल्पाच्या ठिकाणी प्लॅस्टिक वस्तू संकलनाचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.शहरातील ज्या व्यापारी, विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकच्या वस्तू, पिशव्या, द्रोण, वाट्या आदी बंदी केलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतील त्यांना या वस्तू जमा करण्यासाठी २२ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. सार्वजनिक सुटीचा दिवस सोडून सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, या कालावधित प्लॅस्टिक जमा करावे, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, संबंधित व्यापारी आपल्याकडील प्रतिबंधित उपलब्ध प्लॅस्टिकचा साठा राज्याबाहेर विक्री करू शकतात किंवा प्राधिकृत पुनर्चक्रण करणाºया उद्योगाकडे घेऊन प्रक्रिया करू शकतात, असेही नोटिसीत म्हटले आहे.