लासलगाव : येथील गणेशनगरमधील दुर्गामाता मंदिरात १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, संदीपगिरी महाराज, संतोषगिरी महाराज तसेच संतोष ब्रह्मेचा, गुणवंत होळकर, लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सिनेअभिनेते योगेश भोसले व चारू देसले, डॉ. भगवान पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्तांनी अवघ्या एक वर्षात मंदिराची उभारणी केल्याने लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी विश्वतांचे कौतुक केले. मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी स्वागत केले. मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाप्रसाद देण्यात आला. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष लक्ष्मण सांगळे, सचिव नामदेव उगले, खजिनदार विनोद सूर्यवंशी, सहखजिनदार अरुण राऊत, विश्वस्त वृषाली आहेर, रत्नमाला पवार, दिनकर निकम, शिवाजी घुमरे, विनोद चोरडिया, सुनील काळे, वसंतराव भावसार, डॉ. सुभाष वाघमोडे, धनंजय गायकवाड, हेमंत भावसार, हितेश पवार, अविनाश सूर्यवंशी, सागर घुमरे, कल्पेश पवार, गणेश धुमाळ, राहुल जाधव, रमेश पठाण, किशोर उगले यांच्यासह नागरिकांनी परीश्रम घेतले.
लासलगाव येथे दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना
By admin | Updated: September 11, 2016 00:59 IST