शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज श्रींची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:18 IST

मालेगाव : गणेश चतुर्थीनिमित्त पुढील दहा दिवस श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे. शुक्रवारी शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.

ठळक मुद्दे मालेगाव : गणेशभक्तांमध्ये उत्साह; बाजारात चैतन्याचे वातावरण

मालेगाव : गणेश चतुर्थीनिमित्त पुढील दहा दिवस श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे. शुक्रवारी शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.सकाळपासूनच भाविकांनी शहरातील सटाणा नाका, जुना आग्रारोड, कॅम्प, रावळगाव नाका परिसरात मूर्तींचे, सजावटीचे व पूजा साहित्याचे स्टॉल लागले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व महापालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक मंडळांनी तयारी सुरू केली होती. शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला बंदी घातली आहे. शहरात शुक्रवारी १२५ प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मर्यादा येणार असल्या तरी गणेशभक्तांमध्ये उत्साह दिसून आला. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ३०० मोठे व शंभरापेक्षा अधिक लहान गणेश मंडळ श्रींची स्थापना करतात. मात्र यंदा ग्रामीण भागातही कोरोनाने डोके वर काढले आहे. असे असले तरी एक गाव एक गणपती बहुतांशी ठिकाणी स्थापन केला जाणार आहे. पोलीस व मनपा प्रशासनानेही गणेशोत्सवाची तयारी केली आहे. पोलिसांनी शहरातील ६७ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. तर नऊ व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. यंदा बाहेरगावाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली नाही. स्थानिक पोलीस यंत्रणेकडून गणेशोत्सव काळात बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव