शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

दृष्टिदानाच्या संकल्पासह समाजाला प्रेरित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:11 IST

नाशिक : नेत्रदानास महादान असे संबोधण्यात येते. जर एखाद्या व्यक्तीला डोळ्यांअभावी या जगाचे सौंदर्य दिसले नाही, तर या ...

नाशिक : नेत्रदानास महादान असे संबोधण्यात येते. जर एखाद्या व्यक्तीला डोळ्यांअभावी या जगाचे सौंदर्य दिसले नाही, तर या पृथ्वीवरील त्याचा जन्म अपूर्णच मानला जातो. त्यामुळे सुजाण नागरिकांनी दृष्टिदानाच्या संकल्पासह समाजाला नेत्रदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन नाशिकच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडचे (नॅब) अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केले आहे.

जागतिक दृष्टी दिनाच्या पार्श्वभूमीवर नेत्रदानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यास लोकांना प्रेरित करणे, हे या दिनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या मृत्यूपश्चात अन्य नेत्रबाधितांना हे जग बघता यावे यासाठी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदानाचा संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केेले. नेत्रदान प्रक्रियेमध्ये एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे नेत्रदानाची वैद्यकीय प्रक्रिया मृत्यूच्या ६ ते ८ तासांच्या आत करणे आवश्यक असते. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुःखाच्या आवेगात असलेल्या कुटुंबाला वेळेचे भान ठेवून ही प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूमध्ये नेत्रदान कमी अपेक्षित आहे; परंतु वार्धक्यामुळे आणि दीर्घ आजारामुळे मृत्यूची कल्पना असल्यास कटाक्षाने नेत्रदानाचा विचार झालाच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. मोतीबिंदू किंवा डोळ्याच्या इतर ऑपरेशनद्वारे ग्रस्त रुग्ण नेत्रदान करू शकतात, तसेच चष्मा, मधुमेह, दमा, उच्च रक्तदाब आणि श्वास, हृदयविकार, क्षयरोग इत्यादी शारीरिक विकार असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकत असल्याचे कलंत्री यांनी नमूद केले. इच्छुक व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी नॅब तत्पर असून, अधिक माहितीसाठी सातपूरच्या नॅब कार्यालयात किंवा २३६४३७८ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इन्फो

नॅबच्या सेवेची ३७ वर्षे

नॅब ही संस्था नाशिकमध्ये गेली ३७ वर्षे सातत्याने दृष्टिबाधित बांधवांच्या आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि सर्वांगीण विकास यासाठी कार्यरत आहे. २ विद्यार्थिनींपासून १९८८ मध्ये सुरू झालेल्या नॅबच्या शाळेत आता ७० दृष्टिबाधित विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. नॅबच्या रोजगार प्रशिक्षण केंद्रात दृष्टिबाधित बांधव रोजगाराचे प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

-----------

फोटो

कलंत्री (हार्ड कॉपी)