शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांकडून संवेदनशील मतदार केंंद्रांची पाहणी

By admin | Updated: February 18, 2017 13:34 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिके साठी येत्या २१ फे ब्रुवारीला मतदान होणार आहे़

नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिके साठी येत्या २१ फे ब्रुवारीला मतदान होणार आहे़ या कालावधीत उमदेवारांकडून मतदारांवर दबाव तसेच प्रलोभने दाखविण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस आयुक्त डॉ़रवींद्र सिंघल यांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे़ आयुक्तांनी परिमंडळ दोनमधील संवेदनशील मतदान केंद्रांचीही पाहणी केली़ महापालिका क्षेत्रातील मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्यांविरोधात नागरिकांनी ९७६२१००१०० या आयुक्तांचा व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक तसेच १०० क्रमांक जाहीर केला आहे. महापालिकेसाठी चार गटांचा एक प्रभाग असून, ३१ प्रभागांत १४०७ मतदान केंद्रे आहेत़ या निवडणुकीत ८२१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत़ आपणच कसे निवडून येऊ यासाठी उमेदवारांकडून सर्व प्रकारच्या क्लृप्त्या वापरत आहेत़ उमेदवारांकडून मतदारांना पैसे, पार्टी, बक्षिसे, घरगुती साहित्यांचे वाटप अशी आमिषे दाखविली जातात़ या आमिषांना न भुलणाऱ्या मतदारांवर गुंडांकरवी दबाव आणण्याचे प्रकार यापूर्वी शहरात घडले आहेत़ या सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस आयुक्तांनी नागरिकांच्या निर्भिड मतदानासाठी बाहेर पडता यावे यासाठी काळजी घेत आहेत़ नागरिकांवर दबाव येत असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.