शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीप्रक्रियेत भर उन्हात परीक्षेची शिक्षा

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

पोलीस भरतीप्रक्रियेत भर उन्हात परीक्षेची शिक्षा

नाशिक : पोलीस भरतीप्रक्रियेत शारीरिक चाचणीत मुंबई आणि पुणे येथे सुमारे सात उमेदवारांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आणि या भरती प्रकरणी गृह खात्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले असतानाही पोलीस प्रशासनाने त्यापासून काहीच बोध घेतला नसल्याचे उदाहरण नाशिकमध्ये प्रत्ययास आले असून, रविवारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने पोलीस भरतीची लेखी परीक्षा भर उन्हात घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. लेखी परीक्षेसाठी पहाटेपासूनच कवायत मैदानावर दाखल झालेल्या ३,६५० उमेदवारांना भर दुपारी टळटळीत उन्हात आणि धुळीचा त्रास सहन करत परीक्षेची शिक्षा भोगावी लागली. शहर पोलीस आयुक्तालयाकडून २२ जून रोजी मैदानी चाचणीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्याचवेळी लेखी परीक्षेची तारीखही घोषित करण्यात आली होती. त्यानुसार ४७१ जागांसाठी ४,२८१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या सर्व उमेदवारांना रविवारी (दि.२९ जून) सकाळी ६ वाजता कवायत मैदानावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज पहाटेपासूनच लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची गर्दी कवायत मैदानावर झाली. परीक्षेपूर्वी उमेदवारांना चेस्ट नंबर दिले जाणार होते. उमेदवारांना मैदानाबाहेरील आवारात बसविण्यात आले. तोपर्यंत परीक्षेचे नियोजन करणारे आणि बंदोबस्ताला असणारे कर्मचारी कवायत मैदानावर हळूहळू दाखल होत होते. या कर्मचाऱ्यांची हजेरी आटोपल्यानंतर उमेदवारांना चेस्ट नंबरसाठी पाचारण केले जाऊ लागले. मात्र, चेस्ट नंबर देऊन मैदानात प्रवेश देणे सोयीस्कर असताना पोलीस प्रशासनाकडून उमेदवाराचे हॉल तिकीट, ओळखपत्र आणि नंतर चेस्ट नंबर अशी वेळखाऊ प्रक्रिया राबविली गेली. परिणामी, एका उमेदवारासाठी सुमारे पंधरा मिनिटांचा वेळ खर्ची पडला. परीक्षेसाठी प्रत्यक्षात ३,६५० उमेदवार हजर झाले होते. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सकाळच्या वेळी होणे अपेक्षित असताना पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी पेपर प्रत्यक्षात हातात दुपारी एक वाजेच्या सुमारास देण्यात आला. तोपर्यंत उमेदवारांना खाण्यासाठीही काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिणामी, अनेक उमेदवारांनी कवायत मैदानाबाहेरील दुकानांमध्ये येऊन फास्टफूड, खाद्यपदार्थांचा आधार घेतला. भर दुपारी तळपत्या उन्हात दीड तासाची लेखी परीक्षा उमेदवारांसाठी अग्निदिव्यच ठरले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उमेदवारांना डोक्याला मुंडासे, रुमाल बांधावे लागले. पोटात अन्नाचा कण नाही आणि माथ्यावर तप्त ऊन या चक्रात अडकलेल्या उमेदवारांचे अक्षरश: हाल झाले. ाा सर्व उमेदवारांना रविवारी (दि.२९ जून) सकाळी ६ वाजता कवायत मैदानावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज पहाटेपासूनच लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची गर्दी कवायत मैदानावर झाली. परीक्षेपूर्वी उमेदवारांना चेस्ट नंबर दिले जाणार होते. उमेदवारांना मैदानाबाहेरील आवारात बसविण्यात आले. तोपर्यंत परीक्षेचे नियोजन करणारे आणि बंदोबस्ताला असणारे कर्मचारी कवायत मैदानावर हळूहळू दाखल होत होते. या कर्मचाऱ्यांची हजेरी आटोपल्यानंतर उमेदवारांना चेस्ट नंबरसाठी पाचारण केले जाऊ लागले. मात्र, चेस्ट नंबर देऊन मैदानात प्रवेश देणे सोयीस्कर असताना पोलीस प्रशासनाकडून उमेदवाराचे हॉल तिकीट, ओळखपत्र आणि नंतर चेस्ट नंबर अशी वेळखाऊ प्रक्रिया राबविली गेली. परिणामी, एका उमेदवारासाठी सुमारे पंधरा मिनिटांचा वेळ खर्ची पडला. परीक्षेसाठी प्रत्यक्षात ३,६५० उमेदवार हजर झाले होते. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा सकाळच्या वेळी होणे अपेक्षित असताना पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेसाठी पेपर प्रत्यक्षात हातात दुपारी एक वाजेच्या सुमारास देण्यात आला. तोपर्यंत उमेदवारांना खाण्यासाठीही काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिणामी, अनेक उमेदवारांनी कवायत मैदानाबाहेरील दुकानांमध्ये येऊन फास्टफूड, खाद्यपदार्थांचा आधार घेतला. भर दुपारी तळपत्या उन्हात दीड तासाची लेखी परीक्षा उमेदवारांसाठी अग्निदिव्यच ठरले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उमेदवारांना डोक्याला मुंडासे, रुमाल बांधावे लागले. पोटात अन्नाचा कण नाही आणि माथ्यावर तप्त ऊन या चक्रात अडकलेल्या उमेदवारांचे अक्षरश: हाल झाले. पोलीस कवायत मैदानावर सुमारे चार हजार उमेदवारांची पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. दुपारच्या उन्हात उमेदवारांना मैदानावर तब्बल साडेअकरा ते पावणेतीन वाजेपर्यंत बसविण्यात आले. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांसाठी खास तंबूची व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवार मात्र भर उन्हात मांडी ठोकून जमिनीवर बसून चटके सहन करत होते.