शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी पदासाठी कागदपत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:13 IST

नाशिक : बहुचर्चित तलाठी भरतीप्रक्रियेतील आणखी एक टप्पा पुढे सरकला असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली आहे. ...

ठळक मुद्देभरतीप्रक्रिया : ८३ जागांसाठी २२ हजारांहून अधिक उमेदवार

नाशिक : बहुचर्चित तलाठी भरतीप्रक्रियेतील आणखी एक टप्पा पुढे सरकला असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली आहे. तपासणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे ८० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.तलाठी पदाच्या ८३ जागांसाठी सुमारे २२ हजार ८५३ उमेदवारांनी २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान आॅनलाइन परीक्षा दिली होती. सुमारे २४ दिवस शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षेत येणाºया तलाठी परीक्षेच्या निकालानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.पडताळणीच्या पहिल्याच दिवशी ८० उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक अर्हता, शाळेचा दाखला आणि रहिवासी पुरावा असलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तपसाणीची व्यवस्था करण्यात आली होती. मंगळवारी दुसºया टप्प्यात आणखी ८३ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांना पडताळणीसाठी येणे शक्य नव्हते त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविली असून त्यांना एका दिवसाची मुदत देण्यात आल्याचे समजते. तर काहींनी एसएमएस मिळाले नसल्याचीदेखील तक्रार केली. पडताळणीसाठी दोन दिवस अगोदर भ्रमणध्वनीवर संदेश येणे अपेक्षित असताना अनेकांनी वेळेत एसएमएम मिळाले नसल्याची तक्रारही केली. तलाठी पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीनंतर हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती. यासंदर्भातील कोणतीही हरकत आली नसल्याने यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. उर्वरित उमेदवारांची तपासणी मंगळवारी (दि.१८) होणार आहे. पेसा क्षेत्राबाहेरील ६१ जागांसाठी १८ हजार ९७१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती तर पेसा क्षेत्रातील २२ जागांसाठी ४१५६ तरुणांनी आॅनलाइन परीक्षा दिली होती.

टॅग्स :Governmentसरकारgovernment jobs updateसरकारी नोकरी