शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून नुकसानीची पाहणी

By admin | Updated: June 30, 2017 00:09 IST

नागरिकांच्या घरामधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून सिडको : खाक झाल्या असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील अश्विननगरमध्ये अचानक वाढलेल्या विजेच्या दाबामुळे परिसरातील वीसहून अधिक नागरिकांच्या घरामधील एसी, पंखे, इर्न्व्हटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी प्रभागाचे नगरसेवक किरण गामणे यादेखील उपस्थित होत्या.अश्विननगर भागात गेल्या शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक विजेचा प्रवाह वाढल्याने वीसहून अधिक रहिवाशांच्या घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली. तर एका घरातील वातानुकूलित यंत्राचा स्फोट झाल्याची घटना घडली असून, सुदैवाने यात मोठी दुर्घटना घडली नाही. गौरीशंकर गोपीराम अग्रवाल, राधेय मालपाणी, प्रशांत गोयल, राहुल मालपाणी, उपेंद्र काळे, अरविंद करकरे आदींसह वीसहून अधिक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. यात गौरीशंकर अग्रवाल यांच्या घरातील पाण्याची मोटार, मोबाइल चार्जर, इलेक्ट्रॉनिक्स गिझर, तर राधेय मालपाणी यांची लिफ्ट, तसेच मोटार जळून खाक झाली. गुरुवारी सकाळी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता ए. बी. पवार यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्राहकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक किरण गामणे उपस्थित होत्या. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांचे काय-काय नुकसान झाले याबाबतची यादी तयार केली असून, अहवाल तयार केला आहे.