शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील महिलेच्या प्रसूतिप्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:11 IST

सिडको : सिडकोच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दाखल न करता गर्भवती महिलेला तसेच पाठविल्याने रस्त्यातच प्रसूती झाल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे.

ठळक मुद्दे ‘त्या’ महिलेवर दबाव

सिडको : सिडकोच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दाखल न करता गर्भवती महिलेला तसेच पाठविल्याने रस्त्यातच प्रसूती झाल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे. दरम्यान, ‘त्या’ महिलेवर दबाव आणून असे काही झालेच नाही असे वदवून घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांचा आटापिटा सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने याप्रकरणाचा तिढा अधिकच वाढला आहे. प्रसूतिकळा आलेल्या गरोदर महिलेला मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून न घेता घरचा रस्ता दाखवला.यामुळे पतीसोबत घरी पायी जात असताना गीता लोंढे भोवळ येऊन रस्त्यावर पडली असताना प्रभागाच्या महिला नगरसेवक भाग्यश्री ढोमसे यांनी तत्काळ परिसरातील महिलांच्या मदतीने लोंढे यांची रस्त्यावरच प्रसूती केली. हा प्रकार घडल्यानंतर बाळ व बाळतिणीला रु ग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाची मागणी राजकिय पक्षांकडून केली जात आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला असे काही झालेच नसून या प्रकरणात डॉक्टरांची काहीच चुकी नाही असे वादवून घेण्यासाठी चक्क रुग्णालयात तिच्यावर दबाव आणत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे गुंता अधिकच वाढला असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Matheranमाथेरानhospitalहॉस्पिटल