शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या तत्कालीन तहसीलदाराची खातेनिहाय चौकशी सुरू

By admin | Updated: February 9, 2017 01:06 IST

दणका : ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह ११ जणांच्या तक्रारीची दखल

अतुल शेवाळे मालेगावसध्याचे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे तहसीलदार व मालेगावचे तत्कालीन तहसीलदार दीपक पाटील यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहेत. यावर स्वामी यांनी उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांना पाटील यांची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तहसीलदार पाटील यांची खातेनिहाय चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.मालेगावच्या तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तत्कालीन तहसीलदार दीपक पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन प्रांताधिकारी संदीप पाटील व दीपक पाटील यांच्यातही खडाजंगी झाली होती. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, देवराज गरुड यांच्यासह इतर अकरा जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्कालीन तहसीलदार दीपक पाटील यांच्या कारकिर्दीविषयी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना विभागीय व खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना तत्कालीन तहसीलदार पाटील यांची शिस्त व अपील नियम १९७९ च्या नियमानुसार दोषारोपपत्र तयार करून तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथील उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांनी तत्कालीन तहसीलदार पाटील यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले असून, तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती दिली.