शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांसाठी अभिनव प्रश्नावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:48 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात तसेच मतांचा टक्का वाढावा यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मतदारांसाठी प्रश्नावली तयार केली आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात तसेच मतांचा टक्का वाढावा यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मतदारांसाठी प्रश्नावली तयार केली आहे.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तसेच संकेतस्थळावर सदर प्रश्नपत्रिका पालकांना उपलब्ध होणार आहे. मतदानासंदर्भातील नऊ प्रश्नांची उत्तरे यामध्ये पालकांना द्यावयाची आहेत. अर्थात ही प्रश्नपत्रिका ऐच्छिक असून, मतदारांमध्ये नावनोंदणीसंदर्भातील जागरूकता तसेच यादीतील बदलाबाबत माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपक्रम राबविले जात असून, मतदारांमध्ये जनजागृतीदेखील केली जात आहे. मतदारांबरोबरच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठीदेखील त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. बोगस नावांची शोध मोहीम तसेच मयत मतदारांची नावे शोधण्याच्या मोहिमेलादेखील मोठे यश मिळाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी मतदारांना जागरूक करण्यासाठी नऊ प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आहे.जिल्हाधिकाºयांच्या या प्रश्नावलीत आपले नाव मतदारयादीत समाविष्ट आहे का? आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत का? कुटुंबातील अठरा वर्षे पूर्ण होऊनही मतदान यादीत नाव न नोंदलेले कुणी आहे का? मतदार यादीतील नाव, पत्ता, लिंग, वय बरोबरच छापलेले आहे काय? कुटुंबात कुणी दिव्यांग मतदार आहे का? कुटुंबातील मयत व्यक्तीचे नाव कमी केले आहे का? मतदार यादीतले आपले नाव कोणत्या भागामध्ये आणि कुठल्या मतदान केंद्रांवर आहे? २००९ मधील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे का? आगामी विधानसभा निवडणुकीत आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहात का? असे प्रश्न विचारून जागृती मोहिमेत जिल्हाधिकाºयांनी सहभाग घेतला आहे.दुरुस्तीची संधीसदर प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार असून, ती ते आपल्या पालकांकडून भरून घेणार आहेत. जेणे करून त्यांनी वरील प्रश्नांपैकी कोणत्याही दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये पालकांची आणि विद्यार्थ्यांची माहिती भरून घेतली जाणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय