शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्यपूर्ण तरतुदी, संभ्रमाची परंपराही कायम जयंत पित्रे : केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ चे विश्लेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:05 IST

नाशिक : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक नावीन्यपूर्ण तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या.

ठळक मुद्देअर्थसंकल्प २०१८ चे विश्लेषणतरतुदींत मात्र नि:संदिग्धता

नाशिक : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक नावीन्यपूर्ण तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या असल्या तरी अनेक तरतुदींविषयी संभ्रमाची परंपरा कायम असल्याचे प्रतिपादन प्रत्यक्ष करतज्ज्ञ तथा ज्येष्ठ सनदी लेखापाल जयंत पित्रे यांनी केले आहे. येथील मु. शं. औरंगाबादकर सभागृहात लोकमत, इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियाची नाशिक शाखा, महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे आयोजित ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१८ चे विश्लेषण’ कार्यक्रमात ते शनिवारी (दि.२४) बोलत होते. याप्रसंगी अप्रत्यक्ष करतज्ज्ञ तथा ज्येष्ठ सनदी लेखापाल योगेश प्रसादे, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, सीए इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष मीलन लुणावत, नाशिक टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश गिरासे आदी उपस्थित होते. जयंत पित्रे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रकाशझोत टाकताना शेअर बाजारातील गुंतवणूक व करआकारणी, धर्मदाय संस्था आणि कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळांसाठीच्या तरतुदी आदींविषयी माहिती दिली. तर कृषी मालाला सरकारने दीडपट हमीभावासाठी केलेल्या तरतुदींत मात्र नि:संदिग्धता दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.योगेश प्रसादे यांचे मार्गदर्शनकेंद्रीय अर्थसंकल्प २०१८ विश्लेषण कार्यक्रमात ज्येष्ठ सनदी लेखापाल योगेश प्रसादे यांनी अप्रत्यक्ष करांसंबंधी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारसमोर जीएसटी करप्रणाली यशस्वी करण्याचे आव्हान होते. तांत्रिक अडचणींमुळे सरकारच्या महसुलाच मोठ्या प्रमाणात घट होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. परंतु सरकारने पेट्रोलियम पदार्थांसारखी जीएसटीमुक्त उत्पादने व प्रारंभी अधिक प्रमाणात जीएसटीची आकारणी करून या आव्हानाचा सामना केल्याचे त्यांनी नमूद केले.