शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला नावीन्यपूर्ण प्रकल्प

By admin | Updated: January 31, 2017 02:02 IST

रतन टाटा : ‘बॉटनिकल गार्डन’मध्ये राज ठाकरेंसोबत फेरफटका

नाशिक : एका आगळ्यावेगळ्या इको फ्रेन्डली संकल्पनेतून ‘बॉटनिकल गार्डन’च्या रूपाने एक नावीन्यपूर्ण प्रकल्प नाशिकला मिळाला. हा प्रकल्प निसर्गप्रेमींना निश्चित आकर्षित करणारा आहे, असे मत टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी उद्यानाला दिलेल्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.पांडवलेणीच्या जवळ असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचा विकास करून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारण्यात आलेल्या ‘बॉटनिकल गार्डन’ला रतन टाटा यांनी राज ठाकरे यांच्यासमवेत सोमवारी (दि. ३०) भेट दिली. यावेळी त्यांनी उद्यानात इको फ्रेण्डली वाहनातून फेरफटका मारत विकासकामांची पाहणी केली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास टाटा यांचे उद्यानात आगमन झाले. फुलपाखरूच्या आकारामध्ये तयार करण्यात आलेले उद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार पाहून टाटा यांनी आनंद व्यक्त केला. ठाकरे व टाटा यांनी येथील बालोद्यान कक्षामध्ये उभारण्यात आलेल्या आशियाई व आफ्रिकन हत्तींच्या प्रतिकृती न्याहाळल्या. तेथून ‘कथा अरण्याची’ या संकल्पनेतून खुले नाट्यमंचाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या लेझर शो-बोलक्या झाडांची पाहणी केली. यावेळी संबंधितांकडून रतन टाटा यांना सदर पर्यावरणपूरक निसर्ग संवर्धनासाठी प्रबोधनात्मक संकल्पना विशद करण्यात आली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन टाटा यांचे नाशिककरांच्या वतीने स्वागत केले. वनविकास महामंडळ, टाटा ट्रस्ट व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू वनोद्यानाचा विकास साधला गेला आणि ‘बॉटनिकल गार्डन’ उभारण्यात आले. या प्रकल्प उभारणीला टाटा ट्रस्टने सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.वो फायबर के पेड हैं...‘अभी हमने जो पेड देखें वो फायबर के हैं, और रात में ये बाते करते हैं...’ असा संवाद राज ठाकरे यांनी उद्यानातून बाहेर पडत असताना रतन टाटा यांच्याशी साधला. यावेळी टाटा यांनी मनमोकळे हसत त्यांना दाद दिली. ‘ये प्रोजेक्ट बहुतही बेहतर हैं और नासिक की बडी मिसाल कायम करेगा’ असे मत त्यांनी ठाकरे यांच्याशी फेरफटका मारताना व्यक्त के ले.