शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडी जखमी

By admin | Updated: February 1, 2017 22:35 IST

बंदोबस्ताची मागणी : भयभीत महिलांचे पालिकेला निवेदन

सिन्नर : भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात सदर घटना घडली. जिल्हा रुग्णालयात अडीच वर्षाच्या मुलीवर उपचार केल्यानंतर गौतमनगर भागातील भयभीत महिलांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष किरण डगळे यांना दिले. येथील तहसील कार्यालयाच्या भिंतीला लागूनच गौतमनगर परिसर आहे. या भागात राहणारी दर्शना कांतीलाल कोरडे ही अडीच वर्षाची चिमुरडी तहसील कार्यालयाच्या आवारात खेळत होती. यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर अन्य ५ ते ६ कुत्र्यांनी या चिमुरडीवर हल्ला करून तिला सुमारे दहा मीटर अंतर ओढत नेले. सदर प्रकार पाहून नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून या चिमुरडीची सुटका केली. त्यानंतर जखमी दर्शना हिला पालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दर्शनाच्या मांडीला, डोक्याला व मानेजवळ असे सुमारे ६० टाके पडले असल्याची माहिती कोरडे कुटुंबीयांनी दिली. नगराध्यक्ष डगळे यांना दिलेल्या निवेदनावर शीतल कोरडे, मीना जोशी, शकुंतला आरणे, ताराबाई जगताप, योगीता गायकवाड, स्वप्नाली जाधव, शांताबाई जाधव, छाया चव्हाण, यमुना सानप, कविता गोडे, शांताबाई सोनवणे, रेखा घोलप, शीतल गवळी यांच्यासह रहिवाशांची नावे आहेत. (वार्ताहर)