शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआर अंतर्गत उपक्रमांसाठी पुढाकार स्मार्ट सिटी : शिवाजी उद्यानाचा पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:12 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे.

ठळक मुद्देआरसेलर-मित्तल कंपनी पुढे३८३ कोटी रुपये अनुदान प्राप्त

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन झालेल्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली असतानाच सीएसआर अंतर्गतही काही संस्था, उद्योजक यांनी उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले आणि सर्वात जुन्या असलेल्या शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासासाठी आरसेलर-मित्तल ही कंपनी पुढे आली असून, तसा प्रस्ताव कंपनीला देण्यात आल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली.स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना झालेली आहे. कंपनीकडे आतापर्यंत केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून सुमारे ३८३ कोटी रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. कंपनीने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत रेट्रोफिटिंग अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन आणि नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाची कामे हाती घेतली असून, मार्च २०१८ अखेर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनीने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ कि.मी. मार्गावर स्मार्ट रोड साकारण्यासाठीही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. एकीकडे कंपनीमार्फत प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच काही शिक्षण संस्था, उद्योजक, कारखानदारही सीएसआर अंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात प्रामुख्याने, शहरातील सर्वात जुन्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी उद्यानाचा समावेश आहे. शिवाजी उद्यानाच्या पुनर्विकासाठी आरसेलर या युनाटडेड किंगडममधील कंपनी तसेच मित्तल या भारतीय कंपनीने संयुक्तरीत्या प्रस्ताव महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडे दिलेला असून, विचार सुरू असल्याची माहिती थविल यांनी दिली. याशिवाय, अशोकस्तंभ येथील वाहतूक बेट सुशोभिकरणासाठी संदीप फाउंडेशन, सीबीएस येथील चौक सुशोभिकरणासाठी नाशिक फर्स्ट तर त्र्यंबक नाका चौक सुशोभिकरणासाठी विंचूरकर डायग्नोस्टिक यांनी उत्सुकता दाखविली आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती थविल यांनी दिली.योगदान देण्यास उत्सुकनाशिक महापालिकेने गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसेच्या सत्ताकाळात सीएसआर अंतर्गत नेहरू उद्यानात वनौषधी उद्यान, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, होळकर पुलावर वॉटर कर्टन, संगीत कारंजा, उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण तसेच बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय हे उपक्रम साकारले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा काळातही अनेक वाहतूक बेटांचे सुशोभिकरण सीएसआर अंतर्गत झालेले आहे. शहराचा बदलणारा चेहरामोहरा पाहता आणखीही उद्योजक, कारखानदार, बॅँका सीएसआर अंतर्गत आपले योगदान देण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.