नाशिक : जिल्'ातील सुमारे चार हजार मुख्याध्यापकांपैकी शासन नियमानुसार २० टक्के मुख्याध्यापकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ गेल्या काही वर्षांपासून देण्यात आलेला नसून यासंदर्भात जिल्हा मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची भेट घेतली. यासंदर्भात किती मुख्याध्यापकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे बाकी आहे, याची तातडीने माहिती सादर करण्याचे आदेश बनकर यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. शासन नियम आणि त्यानुसार कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी मुख्याध्यापक संघटनेचे काही पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी सुखदेव बनकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागितली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना बोलावून त्याबाबत विचारणा केली. मुख्याध्यापकांना निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबतची कार्यवाही करण्याचे काम दोघा महिला कर्मचाऱ्यांकडे असल्याचे बनकर यांच्या लक्षात आले. याच महिला कर्मचाऱ्यांकडे शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची कामे आहेत. त्यामुळे सुखदेव बनकर यांनी याबाबत मोगल यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत आधीच सेवानिवृत्तीचे काम असताना पुन्हा त्यांच्याकडे वेतनश्रेणी निश्चितीचे काम का दिले? जिल्'ात किती मुख्याध्यापकांना वरिष्ठ वेतनश्रेणी बाकी आहे याबाबत तत्काळ माहिती सादर करण्याचे आदेश दिले. जिल्'ात सुमारे चार ते पाच हजार मुख्याध्यापक असून, शासन नियमानुसार त्यातील २० टक्के मुख्याध्यापकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
सीमुख्याध्यापकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीची मागविली माहिती
By admin | Updated: November 10, 2014 23:44 IST