शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत देता येणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित ...

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्न बँक खात्याची माहिती तत्काळ मागविण्यात आली आहे. ही माहिती सादर करण्यास देण्यात आलेली ३१ मेपर्यंतची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत परीक्षा शुल्क माफीस पात्र तथा अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ - २०मध्ये अवेळी पावसामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांना कोरोनामुळे माहिती सादर करण्यात अडचणी निर्माण झाल्याने राज्य मंडळांने याविषयीची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थीनिहाय भरून संकेतस्थळ‌ावर सबमिट केल्यानंतर यादीच्या शेवटी देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य यांना स्वाक्षरीसह प्रमाणित करून अपलोड करावे लागणार आहे. यानुसार बँक खात्याचा तपशिल प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

इन्फो-

प्रतिपूर्तीचा लाभ थेट बँक खात्यात

परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्य मंडळ स्तरावरून एनईएफटी अथवा आरटीजीएसद्वारे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती राज्य मंडळाला वेळेत मिळणे आवश्यक आहे. ही माहिती वेळेत उपलब्ध न झाल्यास या लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीत मंडळाला सादर करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.