शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांच्या माहितीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:48 IST

मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे.

नाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना विशेष सुविधा देण्यात येणार असल्याने मतदान केंद्रनिहाय त्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून केले जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख इतकी आहे.गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील टक्का अपेक्षित नसल्याने विधानसभेत मतांचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. निर्दोष यादी करण्यासाठी निवडणूक शाखेने मोठी मोहीम राबविली आणि सुमारे ५६ हजार दुबार आणि मयत नावे यादीतून काढून टाकली. तर नव्याने १९ हजारांपेक्षा अधिक नावे यादीत समाविष्ट झाली. जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार विधानसभेसाठी मतदान करणार आहेत.लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदानापासून वंचित राहणाऱ्या घटकांची मतदार म्हणून नोंद करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. विधानसभेच्या मतदार यादीतील स्त्री आणि पुरुष मतदारांप्रमाणेच तृतीय पंथियांचीदेखील नोंदणी करण्यात आली असून, जिल्ह्यात ३५ तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद अंतिम मतदार यादीत करण्यात आलेली आहे.दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्यानिवडणूक शाखेने अपंगांना प्रमाणपत्र देणाºया जिल्हा शासकीय रुग्णालये, अपंगांसाठी योजना राबविणाºया समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग याशिवाय महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून अपंग कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. दिव्यांगांचा मतदार म्हणून नोंद करतानाच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या जात आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक