शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भावा-बहिणीच्या प्रेमाला महागाईचा फटका

By admin | Updated: August 6, 2014 02:01 IST

भावा-बहिणीच्या प्रेमाला महागाईचा फटका

 

नाशिक : बहीण-भावामधील अतूट नात्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला केवळ काही दिवसच बाकी असल्याने बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये कार्टून, चमकी या पारंपरिक राख्यांसहित धातूच्या राख्या आणि पंतप्रधान मोदींचा मुखवटा असलेल्या राख्याही उपलब्ध झाल्या आहेत. मेनरोड आणि भद्रकाली, पंचवटी तसेच उपनगरांत विविध ठिकाणी राख्यांची दुकाने थाटली गेली आहेत. यंदा राख्यांमध्ये नियमित राख्यांबरोबरच १५० नवीन प्रकार दाखल झाले आहेत. त्यात पेन विथ लाइट (५५ रु.), स्पायडरमॅन (२१ ते ४० रु.), मकडी (४५ रु.), पेंग्वीन (७० रु.), कार्टून किचन (२५ रु.), अ‍ॅनिमेटेड गणेशा (४० रु.), स्पार्कलिंग लाइट राखी, मिकीमाउस (१५ ते ५० रु.), टेडीबेअर (५ ते ५० रु.), हनुमान, धूमबाइक, मोबाइल, स्मार्टफोन, किल्लीची गाडी, खोपडी, धूम थ्री, चेन्नई एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचा आनंद घ्यायचा आणि नंतर छानपैकी ही आपली आवडती खेळणी खेळायची असा दुहेरी लाभ मुलांना मिळणार आहे. यावर्षी लहान मुलांसाठी निर्माण झालेल्या चित्रपटातील पात्रांचा त्यांना पूर्ण आनंद घेता येणार आहे. महिलांसाठीदेखील लुंबा नावाच्या सप्तरंगी लोंबत्या राख्या बाजारात आल्या असून, २५ ते ५० रुपये दराने त्या मिळत आहेत. याशिवाय जरदोसी वर्क, रुद्राक्ष, मोरपिसे, शंख, स्टोन, मोती, चांदी, रेशमी धागे आदिंचा वापर करून तयार केलेल्या राख्याही दुकानांमध्ये पाहायला मिळत आहेत. या राख्या डझनाच्या स्वरूपात घेतल्या जात असून, ५६ रुपये डझन, ५० रुपये डझन या दराने मिळत आहेत. रुद्राक्ष, ओम, रेशीम गोंड्याच्या राख्या यांनाही चांगली मागणी आहे. कोलकाता, मुंबई, संदूर या ठिकाणांहून राख्या उपलब्ध होत असून, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याचा फटका राख्यांच्या किमतीला बसला आहे. त्यामुळे किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)