शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनच्या काळात घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:26 IST

नाशिक : लॉकडाउन काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जंगलांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्याने वनविभागाच्या नाकीनव आले आहे. वनविभागाकडून दक्षता पथकासह सर्वच गस्ती पथकांना ‘अलर्ट’ दिला गेला आहे.

नाशिक : लॉकडाउन काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जंगलांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्याने वनविभागाच्या नाकीनव आले आहे. वनविभागाकडून दक्षता पथकासह सर्वच गस्ती पथकांना ‘अलर्ट’ दिला गेला आहे. सातत्याने त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल या संवेदनशील वनपरिक्षेत्र अंतर्गत दिवस-रात्र गस्तीवर आणि जंगलांच्या फिरस्तीवर भर दिला जात आहे. पेठ वनपरिक्षेत्रातील काही गावांमध्ये रात्रीच्या सुमारास वनक्षेत्रपालांच्या पथकाने एक नाल्यामध्ये दडवून ठेवलेली सागाची काही लाकडे जप्त केली. सकाळी आजूबाजूचा सगळा परिसर पिंजून काढला असता सागाची एकूण ४० नग वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी जप्त केले.पेठ-नाशिक-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर पेठ वनपरिक्षेत्रच्या हद्दीत नियमितपणे जंगलांच्या भागात गस्त का ती जात होती वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांचे पथक गस्तीवर होते. दरम्यान, उंबरदहाड, रुईपेठा, कोहूर या तीन गावांत नाल्यामध्ये टप्याटप्याने सागाची लाकडे लपवून ठेवण्यात आली होती. वनविभागाच्या गस्तीपथकाने मात्र लाकूडतोड्यांचा हा डाव उधळून लावला. या तिन्ही गावांच्या हद्दीतून सागाची सुमारे ४० नग (०.२६० घनमीटर) इतके लाकूड जप्त करण्यास वनविभागाला यश आले आहे.लॉकडॉउन काळात हाताला रोजगार न राहिल्यामुळे शहरी भागात स्थलांतरित झालेले लोक पुन्हा ग्रामीण भागात परतले आहे. पेठ हा अत्यंत दुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाळ्यात सहजरीत्या रोजगार उपलब्ध होतो कारण शेतीच्या कामांना तेव्हा वेग आलेला असतो, मात्र अन्य दिवसांमध्ये रोजगारासाठी येथील आदिवासी नागरिकांना भटकंती करावी लागते काही नागरिक नाशिक शहरात तर काही गुजरात राज्यातदेखील रोजगारासाठी स्थलांतरित होतात. कोरोना आजाराचा फैलाव राज्यात वेगाने होऊ लागल्याने महिनाभरापूर्वीच लॉकडाउन घोषित केले गेले. त्यामुळे सगळे लोक आपापल्या घरी परतले आहे. घरात रिकामे बसून राहावे लागत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचाच फायदा काही गुन्हेगार घेत असून, गोरगरीब भोळ्याभाबड्या स्थानिकांना पैशांचे आमिष दाखवून जंगलात घूसखोरी करण्यास भाग पाडले जात आहे. साग, खैर, चंदन यासारखी मौल्यवान वृक्ष प्रजातीवर कुºहाड चालविण्यासाठी स्थानिक लोकांना भाग पाडले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वनविभागाची जंगलाच्या रूपाने असलेली ह्यखुली तिजोरीह्ण धोक्यात येऊ लागली आहे.पेठ भागात करण्यात आलेल्या कारवाईत सागाची ४० नग जप्त केले गेले. या लाकूडतोडीत स्थानिकांचा सहभाग असून, घरगुती कारणासाठी स्थानिक स्तरावरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून हा गुन्हा घडविला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज मुसळे यांनी वर्तविला आहे. शेजारील राज्यातील तस्करटोळ्यांचा यामागे काही हात आहे का, याचीही चाचपनी केली जात असून, धागेदोरे शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, हरसूल, पेठ या दोन्ही संवेदनशील वनपरिक्षेत्रांमध्ये सर्व वनरक्षकांना आपापल्या बीटमधील जंगल भागात अधिक गस्त घालावी, त्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची मदत घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक