शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:03 IST

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे गावातील एका ४६ वर्षीय पुरु षाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  आल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे गावातील एका ४६ वर्षीय पुरु षाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह  आल्याने तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तसेच तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेले झारली पाडा येथील सहा पैकी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, एक रिपोर्ट येणे बाकी असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील गावापासून दूर असलेल्या वस्तीवरील ४६ वर्षीय पुरु ष जो मुंबई येथे नोकरीस असून, तो २६ एप्रिल रोजी मुंबई येथून एका भाजीपाला वाहतूक करणाऱ्या गाडीमधून गावांकडे पोहोचलेला होता. गावापासून वस्ती दूरवर असल्याने संबंधित व्यक्ती मुंबईवरून आल्याची कुणकुण चार दिवसानंतर लागली. त्यानंतर प्रशासनाने माहिती मिळाल्यावर त्याची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करून त्यास नाशिकच्या रु ग्णालयात २ मे रोजी दाखल केले होते.संबंधित रुग्णाचे रिपोर्ट शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणा पुन्हा कामाला लागली असून, आज प्रशासनाच्या वतीने इंदोरे व तळेगाव दिंडोरी शिवारातील त्या रुग्णांच्या वस्तीपासूनचा दोन किलोमीटरचा भाग प्रतिबंधित केला असून, परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी केली जात आहे.त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लहान मोठे असे एकूण १२ व शेजारचे २, व ज्या गाडीत तो आला होता त्या गाडीचा चालक असे एकूण १५ जणांना कोविड विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांची तपासणी करून स्वॅब परीक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच चार दिवसात ती व्यक्ती अजून परिसरातील कोणत्या गावात, कोणाकडे गेली होती याचाही शोध सुरू आहे.-----प्रशासन सतर्कसंबंधित रु ग्ण व त्याचे कुटुंब व परिसरातील नागरिकांना उपाययोजना करण्यासाठी प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कोशिरे, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, तळेगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, त्यांची सर्व टीम, प्रशासनाची सर्व टीम विशेष परिश्रम घेत आहे. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहत आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. संदीप आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कोशिरे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक