------------------------
महागडी औषधी वाया
अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधी फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. शेतकरी वर्ग हा नेहमी प्रयत्नवादी राहून शेतात कष्ट करून राबराब मेहनत करतो. त्यात शेतकऱ्यांना अनेक संकटं येत असतात. सध्या महागाईत भरमसाठ वाढ होत आहे. महागाई वाढली असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत.
---------------------
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
पावसाळ्याचा जवळपास दीड महिना उलटला आहे तरीही राजापूर येथील छोटे-मोठे बंधारे, नाले कोरडेठाक असून विहिरींनी अजूनही तळ गाठलेला आहे. राजापूर व परिसरात काही विहिरींना चांगले पाणी उतरले आहे, तर काही विहिरींना उळे टाकण्यासाठी विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. एक गाव व त्या गावचे दोन भाग निसर्गाने निर्माण केले आहेत. राजापूर गावातील काही भागांत विहिरींना पाणी असल्याने शेतकरी शेततळे पाण्याने भरत असून, व इतर ठिकाणी पाणी नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. यावर्षी हवामान विभागाचा अंदाज येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात तरी फसवा ठरला आहे.
(२४ राजापूर)
240721\24nsk_23_24072021_13.jpg
२४ राजापूर