शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

औद्योगिक वसाहतीतील पोलीस गस्तीचा फज्जा!

By admin | Updated: November 9, 2015 00:34 IST

आश्वासन हवेत : पहिल्याच दिवशी आठ लाखांची रोकड लंपास

नाशिक : अंबड व औद्योगिक वसाहतींमध्ये दिवाळीत कडक पोलीस बंदोबस्त व गस्तीद्वारे तेथील चोऱ्या रोखण्याचे पोलिसांचे प्रयत्न फोल ठरले आहेत़ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका बेकरीच्या पत्र्याचे छत उचकटून चोरट्यांनी सुमारे आठ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाक्यावरील गायकवाडनगरच्या तियारा अपार्टमेंटमधील रहिवासी पवन ठाकूरदास चांदवाणी (३१) यांची सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर १०० मध्ये बाबासाई बेकरी आहे़ शुक्रवारी (दि़ ६) सायंकाळी पावणेसात ते शनिवारी (दि़७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या बेकरीच्या छताचा पत्रा उचकटून, तसेच पीओपी सिलिंग तोडून पहिल्या मजल्यावरील कार्यालयामध्ये प्रवेश केला़ यानंतर कंपनीच्या कार्यालयातील लॉकर तोडून चोरट्यांनी ७ लाख ९५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ या प्रकरणी चांदवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, या घटनेमुळे सातपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही गस्तीबाबत पोलीस जागरुक नसल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)