शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गुंडगिरीमुळे इंदिरानगरवासीय हैराण

By admin | Updated: August 9, 2015 22:47 IST

गुंडगिरीमुळे इंदिरानगरवासीय हैराण

इंदिरानगर : पाथर्डीगाव व पाथर्डी फाटा परिसरातील वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सराईत गुन्हेगारांकडून केली जाणारी मारहाण, त्यामध्ये तलवार व कोयता, चॉपर यांचा होत असलेल्या वापरामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली आहे़पाथर्डीगावात सुमारे आठ हजार लोकवस्ती असून, त्यामध्ये कामगार व शेतकरीवर्गाचा समावेश आहे़ या परिसरातील काही गुंडांनी भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यामध्ये दहशत निर्माण केली असून, त्यांच्याकडून पन्नास रुपयांपासून तर ३०० रुपयापर्यंत वसुली केली जात असल्याची माहिती आहे़ तसेच जे विक्रेते पैसे देणार नाही त्यांना धमकी तसेच शिवीगाळ केली जाते़ काही दिवसांपूर्वीच गुंडांनी रिक्षा जाळण्याचाही प्रयत्न केला होता़ दोन दिवसांपूर्वीच एका रिक्षाचालकावर मद्यप्राशन केलेल्या युवकांनी तलवार, कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे़ तसेच इंदिरानगर परिसरातील विविध चौकांमध्ये झालेल्या हाणामाऱ्यांमध्येही हत्यारांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़ या गुंडांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता असून, इंदिरानगर पोलिसांनी त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ (वार्ताहर)