शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवास घरकुलांसाठी पैशाची मागणी; ग्रामस्थांची तक्रार

By admin | Updated: December 23, 2014 00:14 IST

इंदिरा आवास घरकुलांसाठी पैशाची मागणी; ग्रामस्थांची तक्रार

नाशिक : पेठ तालुक्यातील शिवशेत आंबे येथील ग्रामस्थांकडून इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी चक्क पैशाची मागणी केल्याचा आरोप ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काल (दि.२२) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे केला. बनकर यांनी पेठच्या गटविकास अधिकाऱ्यांना तत्काळ याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.आता इंदिरा आवास घरकुलांचा लाभ देण्यासाठीही पैशाची मागणी होत असल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. शिवशेत आंबे येथील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने सुखदेव बनकर यांना ही व्यथा कथन केली. ज्यांनी पाच हजारांप्रमाणे पैसे दिले, त्यांची नावे या इंदिरा आवासच्या घरकुल यादीत आली असून, ज्यांची नावे आलेली आहेत, त्यातील काही जण चक्क सरकारी व निमसरकारी सेवेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावचे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सर्वांवर या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने इंदिरा आवास घरकुल योजनेतून घर मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी याप्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला व पेठच्या गटविकास अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)