शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावर साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त इंडिगो कार पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:56 IST

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा लावून अवैध मद्याची वाहतूक करणारी इंडिगो कार पकडली असून, त्यामध्ये साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा व वाहन असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

ठळक मुद्दे विशेष मोहिमेंतर्गत कारवाई मद्यविक्रीविरोधात मोहीम विशेष पोलीस दलाची निर्मिती

नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत परिसरात सापळा लावून अवैध मद्याची वाहतूक करणारी इंडिगो कार पकडली असून, त्यामध्ये साडेतीन लाखांचा अवैध मद्यसाठा व वाहन असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ कारचालकाचे नाव संदीप सुकदेव पेखळे (३८, रा. दगूनानानगर, पिंपळगाव बसवंत) असे असून, त्यास अटक करण्यात आली आहे़ ‘क्रॅक डाउन - ३’ या पोलिसांच्या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जिल्ह्यातील अवैध मद्य वाहतूक व विक्री तसेच हातभट्टीची दारू तयार करणाºयांवर छापे टाकले जात आहेत़ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम सुरू केली असून, याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस दलाची निर्मितीही करण्यात आली आहे़ पिंपळगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांचे पथक गुरुवारी (दि.९) गस्त घालीत असताना एका कारमध्ये अवैध मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव शिवारात गायखे पेट्रोलपंपासमोर सापळा रचला होता. एक सफेद रंगाची इंडिगो कार (एमएच १५. बीएन ७१६०) अडवून तपासणी केली़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास देशमुख, मुनिर सय्यद, विष्णू जुंदरे, संजय पाटील यांनी ही कारवाई केली़