शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘घरगुती’ करवाढ मागे घेण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:35 IST

महापालिका स्थायी समितीने घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत पाच वर्षांसाठी सुमारे १२० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्याने सत्ताधारी भाजपा बॅकफुटवर आली असून, ‘घरगुती’ वापरासाठी असलेली करवाढ मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, बिगर घरगुती व वाणिज्य वापरासाठी करवाढ कायम ठेवण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत पाच वर्षांसाठी सुमारे १२० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटल्याने सत्ताधारी भाजपा बॅकफुटवर आली असून, ‘घरगुती’ वापरासाठी असलेली करवाढ मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, बिगर घरगुती व वाणिज्य वापरासाठी करवाढ कायम ठेवण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने मागील आठवड्यात स्थायी समितीवर घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ सुचविणारा प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी, समितीवर भाजपा सदस्यांनी करवाढीचे समर्थन केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्यास मंजुरी दिली होती. प्रस्तावानुसार, घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत सुमारे १२० पटीने वाढ सुचविण्यात आलेली आहे. पाणीपट्टीतील वाढ ही पंचवार्षिक असून, सन २०१९-२० पासून प्रतिवर्षी त्यात एक रुपयाने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांत दुप्पट करवाढ होणार आहे. घरगुती पाणीवापरासाठी सध्या प्रतिहजारी ५ रुपये, बिगर घरगुतीसाठी २२ रुपये आणि व्यावसायिक वापरासाठी २७ रुपये दर आहे. नवीन प्रस्तावानुसार सन २०१८-१९ मध्ये घरगुती दरात ७ रुपये, बिगर घरगुतीसाठी २५ तर व्यावसायिकासाठी ३० रुपये दर असणार आहे. स्थायी समितीने या करवाढीस मंजुरी दिल्यानंतर नाशिककरांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे, माकपा, आम आदमी पार्टी तसेच प्रहार संघटना यांनी जाहीरपणे निषेध करत करवाढीस विरोध दर्शविला. ठिकठिकाणी करवाढीला विरोध दर्शविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. गेल्या शनिवारी (दि.१९) झालेल्या महासभेतही करवाढीमुळे जोरदार हंगामा झाला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने तर पीठासनावरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न करत भाजपाविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. करवाढीला वाढता विरोध लक्षात घेता, भाजपाही आता बॅकफूटवर आली असून, स्थायी समितीने केलेल्या करवाढीच्या प्रस्तावात दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, घरगुती वापरासाठी करवाढ वगळून केवळ बिगर घरगुती व वाणिज्य वापरासाठीच करवाढ करण्याचे संकेत भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी दिले आहेत. स्थायी समितीच्या ठरावात दुरुस्ती करत तोच महासभेवर आणला जाणार आहे.महासभेत करवाढ रद्दबाबत चर्चा होऊन सामान्य नागरिकांना दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.२१) महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी आमदार बाळासाहेब सानप यांनी सर्व पदाधिकाºयांसह स्थायीवर असलेल्या भाजपा सदस्यांची बैठक घेऊन त्यात करवाढप्रश्नी चर्चा केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना सानप यांनी घरगुती वापरासाठी करवाढ रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.वनटाईम घरपट्टीचा विचारस्थायी समितीकडून त्यांनी केलेला करवाढीचा ठराव मागविण्यात आला आहे. त्यावर चर्चा करूनच तो महासभेवर पाठविण्यात येईल. मात्र, सामान्य नाशिककरांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. घरगुती वापरासाठी करवाढ न करता वाणिज्य व बिगर घरगुतीसाठी करवाढ कायम ठेवण्याचा विचार आहे. दरम्यान, १५ वर्षांकरिता वनटाईम घरपट्टी आकारणी करण्याचाही विचार सुरू असून, मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून व शासनाची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी करता येईल काय, यासाठी प्रयत्न केले जातील. वनटाईम घरपट्टीमुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकेल. अर्थात त्यासाठी शासनाची मान्यता आवश्यक आहे.  - बाळासाहेब सानप, आमदार व शहराध्यक्ष, भाजपा