शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: June 2, 2016 00:24 IST

भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण : वाहतुकीस अडथळा

 सिडको : येथील त्रिमूर्ती चौक व परिसरात सकाळ व सायंकाळच्या वेळी भाजीपाला व हातगाडी व्यावसायिक रस्त्यातच बसून आपला व्यवसाय थाटत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन अपघात होतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी व्यावसायिकांना व्यवसाय करताना अतिक्रमण करून व्यवसाय न करता आपल्या दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा, याबाबत थेट संपर्क साधून आवाहन केले.सिडको तसेच परिसरातील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातही घडत आहे. याबाबत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी ही मोहीम हाती घेतली. त्रिमूर्ती चौकात मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून भाजीपाला, फळविक्रेते व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याच भागात शाळादेखील असल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होते व यामुळे अनेकदा अपघातही झाले. वरील सर्व गोष्टींचा विचार करून नाशिक शहर वाहतूक शाखेच्या वतीने व्यावसायिकांना अतिक्रमण करून व्यवसाय न करता दिलेल्या जागेतच व्यवसाय करावा असे आवाहन करण्यात आले. या आवाहनास विक्रेत्यांनीदेखील प्रतिसाद देत काही विक्रेत्यांनंी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढले. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेर्पंत ही मोहीम राबविण्यात आली. (वार्ताहर)