नाशिक : दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात के.टी.एच.एम. महाविद्यालयातील रोशनी मुर्तडक आणि शरयू पाटील यांचा समावेश झाला असल्याची माहिती फेन्सिंग असोसिएशन आॅफ इंडियाचे सचिव राजेंद्रसिंग राणा यांनी दिली. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणाऱ्या या स्पर्धेत आॅस्ट्रेलिया, इंग्लड, कॅनडा, भारत, दक्षिण अफ्रिका यांच्यासह ३१ देशांचा सहभाग असणार आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या विद्यार्थिनी केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असून, याआधी भिलाई येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक तसेच पुणे येथे झालेल्या स्पर्धेत वैयक्तिकगटात सुवर्ण आणि कांस्यपदक त्यांनी पटकावले आहे. भारतीय संघासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचे मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, प्राचार्य दिलीप धोंडगे, क्रीडा अधिकारी संजय सबनीस आदिंनी अभिनंदन केले आहे.
भारतीय संघात नाशिकच्या विद्यार्थीनींचा समावेश
By admin | Updated: July 15, 2015 01:51 IST