शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय जलतरण संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:29 IST

नाशिक : थायलंड येथील फुकेट येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताचा संघ रवाना झाला. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील याचा या संघात समावेश आहे. भोपाळचे दोन व नागपूरचा एक असा चार खेळाडूंचा हा संघ आहे.

ठळक मुद्देयेथील सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांची भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन आॅफ इंडियातर्फेही निवड करण्यात आली आहे.

नाशिक : थायलंड येथील फुकेट येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताचा संघ रवाना झाला. नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटील याचा या संघात समावेश आहे. भोपाळचे दोन व नागपूरचा एक असा चार खेळाडूंचा हा संघ आहे.येथील सावरकर जलतरण तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांची भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे. अंडर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन आॅफ इंडियातर्फेही निवड करण्यात आली आहे. दि. २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहे. स्वयम पाटील या खेळाडूला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक महानगरपालिकेच्या सावरकर जलतरण तलावावरील सर्व सभासद यांनी स्वयमला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मदत केली. महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वयमला शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेत रशिया, जपान, चीन, इजिप्त, पोलंड आदी २१ देशांचा सहभाग आहे. स्वयम डाउन सिन्ड्रम या आजाराने त्रस्त असूनही सर्वसाधारण खेळाडूंच्या स्पर्धेत तो पात्र ठरला आहे. स्वयम ११ वर्षांचा आहे. या जागतिक स्पर्धेतील तो सर्वात लहान खेळाडू आहे. यापूर्वी त्याने जलतरण या खेळात विविध प्रकारचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, वण्डर बुक आॅफ इंटरनॅशनल रेकॉर्ड आदी रेकॉर्ड त्याने केले आहे.कॅप्शन : थायलंड येथील फुकेट येथे होणाºया आंतरराष्ट्रीय फिंन स्विमिंग या स्पर्धेसाठी भारताच्या संघासमवेत संघ व्यवस्थापक हरी सोनकांबळे व स्वयम पाटील. (२०स्विमिंग न्यूज)