शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

रशियातील भारतीय विद्यार्थ्यांचा सन्मान

By admin | Updated: August 1, 2016 01:17 IST

रशियातील भारतीय विद्यार्थ्यांचा सन्मान

 नाशिक : रशिया या देशात वैद्यकीय शास्त्र शिकण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची विशेष पसंती असून, पालकांनी नि:संकोचपणे विद्यार्थ्यांना रशियाला पाठवायला हवे, असे मत डॉ. भूपेंद्र मगाड्रे यांनी रविवारी (दि. ३१) गंगापूररोड येथील हॉटेल बिग सिटीमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले.रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉ. मगाड्रे यांनी रशियामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने चांगले वातावरण असून, विद्यार्थ्यांना भाषा, वास्तव्य तसेच खाण्याची अडचण येत नसल्याचे सांगितले. यावेळी रशियातून शिक्षणक्रम पूर्ण करून आलेले तसेच आता भारतात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. रोहित अग्रवाल (दिल्ली), डॉ. प्रिया वासने (पुणे), डॉ. अविनाश काळे (अहमदनगर) यांचा गौरव करण्यात आला. या मेळाव्यास रशियास्थित २५० भारतीय विद्यार्थी उपस्थित होते.या मेळाव्याप्रसंगी कविता शुक्ल, वैभवी गुजराथी, मानसी वडघुले या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून रशिया देश सुरक्षित असून, याठिकाणी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मेस तसेच हॉस्टेलची वेगळी सुविधा असल्याचे सांगितले. यावेळी ओएसएएच विद्यापीठाचे समन्वयक डॉ. भूपेंद्र मगाड्रे, भारतीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी डॉ. दीपेश रसाळ, एस. एस. साळुंखे आणि प्रा. व्ही. आर. रसाळ यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)