शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृती आजही मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:47 IST

संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.

येवला : संस्कारशील पिढी घडवण्यासाठी राष्ट्रसंतांचा व त्यांच्या विचारांचा आदर करण्याची तसेच आजची पिढी प्रचंड व्यसनाधीन होत चालली असल्याने त्यांचे उद्धबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण तरु ण पिढी देशाचे भवितव्य आहे. नागरिकांनी व तरु णांनी ग्रामस्वच्छता अभियानासह पाणी वाचवण्याचीदेखील सामाजिक बांधिलकी बाळगण्याची गरज आहे. सुसंस्कृत समाजासाठी आजही भारतीय संस्कृती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे भाविकांशी हितगुज साधताना केले.येथील स्वामी समर्थ केंद्राचा वास्तुशांती सोहळा व औदुंबराची मुंज या कार्यक्र मा निमित्त मोरे यांनी येथील केंद्रात मार्गदर्शन केले. तीन दिवस सुरु असलेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ केंद्रांचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील सर्व सेवेकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते. गुरु माऊली मोरे यांचे येथे आगमन झाल्यानंतर शहराच्या वतीने नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, सचिन शिंदे यांनी तर केंद्राच्या वतीने नारायण शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्राच्या सेवेकºयांनी सेंद्रिय शेती, गर्भसंस्कार, शेतीवास्तुशास्त्र, सण व व्रत वैकल्य तसेच भारतीय संस्कृतिची जोपासना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे प्रदर्शने या कार्यक्र मात लावलेले होते. केंद्राच्या वास्तुशांती निमित्त दुर्गा सप्तशतीचा सामुदायीक पाठ, वास्तुशांती व औदुंबर मुंज पूजा झाली. गुरु माऊली मोरे यांनी केंद्रातील नवीन दरबारात प्रथमच येवून मार्गदर्शन केल्याने सेवेकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सेवेकºयांची वाढती संख्या विचारात घेवून पारायणासाठी जागा व मुख्य दरबाराची जागा अपुरी पडू लागल्याने केंद्राचे बांधकाम वाढवण्याचे वर्षापूर्वी ठरले. अल्पावधीत परिसरातील व तालुक्यातील सेवेकºयांनी स्वयंस्फुर्तीने मदत केल्याने आज प्रशस्त व केंद्र साकारले आहे. याठिकाणी औदुंबाराचे झाड लावण्यात आले असून त्याची मुंज देखील झाली.भाविकांच्या संख्येत वाढपारेगावरोड येथे दिंडोरी प्रधान केंद्रातर्फे सन १९८५ मध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाले होते. एका खुर्चीवर स्वामींच्या प्रतिमेची गुरु वारी व सोमवारी आरती केली जायची. पुढे हळूहळू सेवेकºयांची संख्या व सेवेकरी विस्तारत गेले आणि केंद्रही सभागृहामध्ये साकारले. मागील काही वर्षात येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून या केंद्रा तर्फे गुरु चरीत्र पारायण, संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्व शिर्ष पठण, कोटमगाव येथे नवरात्रीत दुर्गा सप्तशती पारायण, कोपरगाव रोडवरील म्हसोबा मंदिरात अपघात टाळण्यासाठी महामृंत्युजय यज्ञ, तसेच सावरगाव येथील स्वामी समर्थ पिठात पारायण व विविध विषयावर व्याख्यान आयोजित केली जातात.